आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे Reliance Jio हेड, या PHOTOSHOOT मुळे आली होती चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईशा अंबानी. - Divya Marathi
ईशा अंबानी.
रिलायन्स जिओच्या लाँचिंगसोबतच रिलायन्स इंडस्ट्रीने टेलिकॉम क्षेत्रात तहलका निर्माण केला आहे. जिओच्या या जोरदार लाँचिंगमागे मुकेश अंबानींची जुळी मुले आकाश आणि ईशा अंबानी यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ईशाने याच वर्षी एप्रिलमध्ये रिलायन्सचे फॅशन पोर्टल एजीओ लाँच (ago.com) केले होते. या फॅशन ब्रँडची जबाबदारी ईशाच सांभाळते. हे पोर्टल लाँच करण्यापूर्वी ईशाने फेमिना मॅगझीनसाठी 2015 मध्ये फोटोशूट केले होते. या फोटोशूटमुळे ईशा लाइम लाइटमध्ये आली होती.
कुठे झाले होते फोटोशूट
- ईशाचे हे फोटोशूट देशातील सर्वात महागडे घर असलेल्या अंबानी कुटुंबीयांच्या अँटिलियामध्ये झाले.
- या फोटोशूटमध्ये ती जंपसूटपासून ते ऑफिशियल कॉर्पोरेट लूकमध्येही दिसून आली.
- बॉलीवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टर यांनी फोटोशूटसाठी तिचा मेकअप केला.
- या फोटोशूटशिवाय ईशा नुकतीच लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवरही अवतरली होती.
- 2012 मध्ये तिने मिझवान फॅशन शोमध्ये तिची आई नीता अंबानीसह रॅम्प वॉक केला होता.
कसे आहे फॅशन पोर्टल...
- रिलायन्स ग्रुपच्या फॅशन पोर्टलचे नाव ago.com आहे. त्याची जबाबदारी ईशा अंबानी सांभाळत आहे. सध्या या पोर्टलवर केवळ वुमेन्स वेअर आहेत.
- सुमारे 200 नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे प्रोडक्ट्स या पोर्टलवर आगामी काळात विक्री केले जाणार आहेत.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार पोर्टल लाँच करण्यापूर्वी त्याची पहिली ट्रायल रिलायन्स कर्मचाऱ्यांमध्ये घेण्यात आली. त्यांची आवड निवड लक्षात घेऊन हे पोर्टल तयार करण्यात आले.
पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा फोटोशूट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...