आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गल्लोगल्ली तयार होतील बँका, स्मॉल फायनान्स बँकांना परवाने देणार : राजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अकरा कंपन्यांना पेमेंट बँक स्थापन करण्याची परवानगी दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेने गुरुवारी पुढील महिन्यात स्मॉल फायनान्स बँकांचे परवाने देण्यात येतील, असे जाहीर केले; पण त्याचबराेबर नव्या बँकांच्या अागमनामुळे विद्यमान बँकांसाठी काेणताही धाेका उत्पन्न हाेणार नाही, असेही स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात गल्लोगल्ली बँकांचे जाळे उभे राहील.
नवीन पेमेंट बँकांमुळे काेणत्याही प्रकारे स्पर्धात्मक धाेका विद्यमान बँकांना हाेणार नाही. उलट या नवीन बँका वैश्विक बँकांसाठी सेवापूरक ठरतील, असा विश्वास गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केला. स्टेट बँक अाॅफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बाेलत हाेते.

राजन म्हणाले की, पेमेंट बँकेमुळे बँकिंग क्षेत्रात क्रांती घडून येईल अाणि ती ग्राहकांसाठी चांगली ठरेल. विद्यमान बँकांच्या सेवा अाणखी अद्ययावत हाेतील. नवीन बँकांच्या अागमनामुळे काळजी करण्याचे काेणतेही कारण नाही, उलटपक्षी प्रत्येक बँकेला संधी उपलब्ध हाेईल, असेही राजन म्हणाले.

स्माॅल फायनान्स बँकेच्या सेवा
1. ठेवी स्वीकारणे अाणि बँक सुविधा नसलेल्या भागात कर्ज वितरणासारख्या मूलभूत बँक सेवा.
2. रक्कम वितरण अाणि हस्तांतर सेवा देता येणार नाही.
3. क्रेडिट कार्ड वितरण करता येणार नाही तसेच एक लाखापेक्षा जास्त ठेवी स्वीकारता येणार नाहीत.
4. एटीएम, डेबिट कार्डचे वितरण.
5. म्युच्युअल फंड अाणि विमा उत्पादनांचे वितरण करण्यास परवानगी.