आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reserve Bank Monetary Policy Declare, Home, Vehicle Loan Installment Affordable

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृह, वाहन कर्जाचा मासिक हप्ता स्वस्त - रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक नाणेनिधी धोरण जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक नाणेनिधी धोरणात मंगळवारी रेपो दरात चालू आर्थिक वर्षातील तिसरी घट करत ०.२५ टक्के कपात केली. त्यानंतर एसबीआयने बेस रेट ०.१५% घटवून ९.७०% केला. अलाहाबाद बँकेने व्याजदरात ०.३०% कपात केली. देना व पंजाब अँड सिंध बँकेने बेस रेट ०.२५% घटवून १०% केला. त्यामुळे गृह, वाहन कर्ज स्वस्त झाले. आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी महागाईबाबत चिंता करत सरकार व शेअर बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बांधील नसल्याचे ठणकावले.

आरबीआयने रेपो दर ७.५० टक्क्यांवरून ७.२५% केला. सीआरआर ४%, एसएलआर २१.५% कायम ठेवला.आरबीआयने या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा पूर्वीचा ७.८ टक्क्यांचा अंदाज घटवून ७.६ %केला. २०१६ पर्यंत महागाई ६ टक्क्यांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली.

रिझर्व्ह बँक ही चिअरलीडर नव्हे...
रिझर्व्ह बँक ही मार्केटसाठी चिअरलीडर नाही. आमचे काम लोकांत विश्वास निर्माण करणे व योग्य निर्णय घेण्यासाठी काम करणे हे आहे. कोणासमोर तसेच एखाद्याच्या तालावर नाचण्याचे नव्हे.
- रघुराम राजन, आरबीआय गव्हर्नर

असा घटणार कर्जाचा ईएमआय
एसबीआयने कर्जाचे दर आता ९.८५ टक्क्यांवरून ९.७० टक्के केले आहेत. यामुळे २० वर्षे परतफेडीच्या गृहकर्जाचा ईएमआय पुढीलप्रमाणे राहील.