आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट चिट फंड कंपन्यांपासून वाचवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे ‘सचेत’ पोर्टल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चांगल्या प रताव्यांचे आमिष देऊन सर्वसामान्य लोकांच्या मेहनतीचा पैसा जमा करणाऱ्या बनावट चिट फंड कंपन्यांवर नियंत्रण मिळवणे आता शक्य होणार आहे. यासाठी गुरुवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘सचेत’ नावाने नवे पोर्टल सादर केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांकडून अवैध पद्धतीने पैसे जमा करणाऱ्या कंपन्यांबाबत सर्व माहिती मिळवता येणार आहे. तसेच ज्या कंपन्यांना या संबधीत परवानगी मिळालेली आहे अशा कंपन्यांबाबतदेखील यामध्ये माहिती देण्यात आलेली असेल. याव्यतिरिक्त फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात तक्रारदेखील या पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे.
sachet.rbi.org.in नावाचे हे पोर्टल विविध नियामक आणि सरकारी संस्थांमध्ये ताळमेळ वाढवण्याचे काम करणार असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेने केला आहे. गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
छायाचित्र: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘सचेत’ या पोर्टलची माहिती गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुुुरुवारी दिली. या वेळी डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुद्रा, सेबीचे सदस्य एस. रमण यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...