आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Respect More Important Than Salary, Employers Mentality

पगारापेक्षा मान - सन्मान महत्त्वाचा ! जगातील कर्मचाऱ्यांची मानसिकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय कर्मचारी महिन्याकाठी मिळणाऱ्या पगारापेक्षा कामाच्या वेळेची लवचिकता, मोकळीक आणि मानसन्मान यास जास्त महत्त्व देतात. टॉप एम्प्लॉयर्स संस्थेने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेक्षणात ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे बोनसपेक्षा कर्मचाऱ्यांना संस्थेकडून मिळणारा मान महत्त्वाचा वाटतो. अलीकडच्या काळात पगार तसेच बोनसचे महत्त्व कमी होत असल्याचे निरीक्षणही यात नोंदवण्यात आले आहे.

टॉप एम्प्लाॅयर्स संस्थेने ९६ देशातील ६०० कंपन्यांत सर्वेक्षण केले. या संदर्भात टॉप एम्प्लॉयर्सचे सीईओ डेव्हिड प्लिन्क यांनी सांगितले, सध्या पगाराला तर महत्त्व आहेच, शिवाय कार्यालयीन वेळेत सुलभता, लवचिकता, संस्थेकडून मिळणारा मान-सन्मान या घटकांना महत्त्व आले आहे. सर्वेक्षणानुसार जगातील ३७ टक्के कर्मचाऱ्यांनी कॅफेटेरिया प्लॅन निवडला आहे. यात विविध लाभ, सवलती व भत्त्यांचे उत्तम मिश्रण आहे. प्रत्यक्ष पैशांचा लाभ न मिळणाऱ्या लाभांना कमी-जास्तीचा इतिहास आहे. मात्र हा न बदलणारा ट्रेंड आहे.
मात्र कर्मचाऱ्यांना हवी असलेली वेळेची सुलभता आणि वैयक्तिक लाभाच्या सवलती देण्याबाबत कंपन्या आजही संघर्ष करताहेत. प्राथमिक रोख लाभ देण्यावरून वैयक्तिक लाभ देण्यासाठी कंपन्या प्रयत्न करताहेत मात्र नेमके ते कसे द्यावे याबाबत कंपन्या संघर्ष करताना दिसतात, असे प्लिन्क म्हणाले.

आरोग्यला महत्त्व
कंपन्यांनी कर्मचाऱ्याच्या आरोग्यविषयक खर्चाबाबत अधिक लक्ष द्यावे असे बहुतांश भारतीय कर्मचाऱ्यांना वाटते. कंपनी आरोग्यविषयक काय योजना देते याला जास्त महत्त्व आहे. कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या टोटल रिवॉर्डस तत्त्वाचा वापर करतात. भारतात ब्रेन ड्रेनचे प्रमाण अधिक आहे.