आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RIL चे मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पार, हा आकडा पार करणारी देशातील दुसरी कंपनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरआयएलच्या स्थापनेपासून 51 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. (फाईल) - Divya Marathi
आरआयएलच्या स्थापनेपासून 51 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. (फाईल)
मुंबई - रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मार्केट कॅपिटलने सोमवारी 5 लाख कोटींचा आकडा पार केला आहे. आरआयएलच्या स्थापनेपासून 51 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. दिवसाच्या शेवटी कंपनीचे शेयर 1.33 टक्के वाढीसह 1551 च्या स्तरावर बंद झाले. यापूर्वी 5 लाख कोटींच्या मार्केट कॅपचा रेकॉर्ड टीसीएसच्या नावे होता. टीसीएसने 23 जुलै रोजी हा विक्रम केला होता. 
 
ऐतिहासिक क्षण...
- शेयर बाजारात सोमवारी रिलायंसच्या शेयरने 1559 चा स्तर गाठला. या वर्षीचा रिलायंसचा हा सर्वात मोठा स्तर आहे. क्लोझिंगसह कंपनीचा मार्केट कॅप 5,04,458 पर्यंत पोहचला. अर्थात क्लोझिंगनुसार, रिलायंसाठी हा ऐतिहासिक आकडा आहे. या महिन्यात रिलायंसच्या शेयरमध्ये 13 टक्के वाढ झाली. तर वर्षभराचा विचार केल्यास ही वाढ एकूण 43 टक्के एवढी आहे. 
- व्हॉल्युमबद्दल बोलावयाचे झाल्यास बीएईवर आरआयएलच्या 2.47 शेयर्सची ट्रेडिंग झाली. तर, एनएसईवर 42 लाख शेयर ट्रेडिंगची नोंद आहे. अशा प्रकारे कंपनीने एका दिवसात मार्केट कॅपमध्ये 6,672.09 कोटी रुपयांची वाढ केली. 

 
Jio च्या नवीन प्लॅन्सनंतर स्टॉक्समध्ये तेजी
11 जुलै रोजी रिलायंसने जिओ 4जी ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्सची घोषणा केली. नव्या टॅरिफमुळे कंपनीच्या नफ्याची अपेक्षा वाढली आहे. रेटिंग एजंसी इकराच्या अहवालानुसार, जिओकडे 12 कोटी ग्राहक आहेत. नव्या प्लॅन्समुळे जिओला आणखी ग्राहक वाढवणे आणि असलेल्या ग्राहकांकडून अधिक नफा मिळवणे शक्य होईल. अशातच आरआयएलच्या मार्केट कॅपमध्ये ऐतिहासिक उच्चांक सकारात्मक संकेत मानले जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...