आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबर - डिसेंबर तिमाहीत पीपीएफवर मिळणार 8 % व्याज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वित्तमंत्रालयाने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तिमाहीसाठी अल्प बचतीवरील व्याजदरात ०.१ टक्का कपात केली आहे. त्यामुळे या तिमाहीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजनेतील ठेवींवर कमी व्याज मिळणार आहे.
वित्त मंत्रालयाच्या या सूचनेनुसार पीपीएफवरील व्याजदर ८.१ टक्क्यांवरून ऑक्टोबर - डिसेंबर या तिमाहीसाठी टक्के होईल. पीपीएफवर सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ८.१ टक्के व्याज मिळाले. किसान विकास पत्रातील ठेवींवर आता ७.७ टक्के व्याज मिळणार आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत किसान विकास पत्रावर ७.८ टक्के व्याज मिळाले. व्याजदर घटल्याने किसान विकास पत्राची मुदत आता ११२ महिन्यांऐवजी ११० महिने राहील.
पाच वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पाच वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेवरील व्याजदर घटून अनुक्रमे ८.५ टक्के आणि टक्के राहील. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८.६ टक्के व्याजदर असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज घटून ८.५ टक्के होईल, तर बँकांतील एक, दोन, तीन , चार आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही ०.१ टक्का घट होईल. याशिवाय पाच वर्षांच्या आवर्ती जमा योजनेवरील व्याजदर एक ऑक्टोबरपासून ७.३ टक्के होईल. आतापर्यंत या योजनेत ७.४ टक्के व्याजदर होता. बचत खात्यावरील व्याजदर मात्र टक्के असे जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

विविध योजनावर मिळणारे व्याजदर
{पीपीएफ : टक्के
{ किसान विकास पत्र : ७.७ टक्के
{ पाच वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक बचत : ८.५ टक्के
{ सुकन्या समृद्धी योजना : ८.५ टक्के
{ पाच वर्षांच्या आवर्ती जमा : ७.३ टक्के
{ राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र : 8 टक्के
बातम्या आणखी आहेत...