आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरस शिरल्याने SBI चे 6 Lacks डेबिट कार्ड ब्लॉक, ऐन दिवाळीत ग्राहकांवर संक्रांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या तोंडावर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) एटीएम धारकांना कोणतीही पूर्वसुचना न देता तब्बल 6 लाख 25 हजार डेबिट कार्ड ब्लॉक केले आहेत. इतर बॅंकांच्या एटीएममध्ये एसबीआयचे डेबिट कार्ड टाकल्यानंतर संशयास्पद व्यवहार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
एसबीआयच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग होत असल्याचा संशय बॅंकेच्या प्रशासनाला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यातील रकमेला कोणतेही नुकसान पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एसबीआयकडे येणाऱ्या तक्रारींचा ओघ वाढला होता. इतर बॅंकांच्या एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर चुकीचे व्यवहार होत असल्याच्या या तक्रारी होत्या.
त्यानंतर एसबीआयने याची गंभीर नोंद घेतली. सायबर क्षेत्रातील तज्त्रांचा सल्ला घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी सांगितले होते, की इतर बॅंकांच्या एटीएममधून या डेबिट कार्डमध्ये व्हायरस शिरला असावा. त्यामुळे असे व्यवहार होत असावेत.
यासंदर्भात एसबीआयचे मुख्या तांत्रिक अधिकारी शिवकुमार भसीन यांनी सांगितले, की हिताची पेमेंट सर्व्हिसकडून हॅंडल करण्यात येणारे डेबिट कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत. याबाबत आम्ही सावध पावले उचलत आहोत. ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.
जुलै 2016 पर्यंत एसबीआयने तब्बल 20 कोटी 27 लाख डेबिट कार्ड वितरित केले आहेत. त्यापैकी सुमारे सहा लाख डेबिट कार्ड बंद केल्याने मोठ्या संख्येने असलेल्या ग्राहकांना याचा फटका बसला आहे. कार्ड ब्लॉक केल्याची माहिती बॅंकेकडून ईमेल्स आणि एसएमएस पाठवून ग्राहकांना कळविण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... कसे मिळवता येईल नवीन डेबिट कार्ड... ऐन दिवाळीत ग्राहकांवर संक्रांत....
बातम्या आणखी आहेत...