आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 लाख ATM कार्ड करप्ट, SBI-HDFC सह 5 बॅंकांना फटका, असे ठेवा तुमचे कार्ड सुरक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एसबीआयचे तब्बल 6 लाख डेबिट कार्ड सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यात भरीस भर म्हणून आता एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एस बॅंक, अॅक्सिस बॅंक यांचे तब्बल 32 लाख एटीएम कार्ड करप्ट झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात कार्ड ब्लॉक आणि करप्ट झाल्याने ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
इतर बॅंकांच्या एटीएमचा वापर केल्याने एसबीआयचे कार्ड करप्ट झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल सहा लाख कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय एसबीआयने घेतला. इतर बॅंकांनीही काही ठराविक कार्ड ब्लॉक केले असून ते रिप्लेस करण्याचा सुचना ग्राहकांना दिल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये बॅंकांनी केवळ एटीएम पीन बदलण्याचा सुचना ग्राहकांना दिल्या आहेत.
चीनमधील काही ठिकाणांहून कार्डचा वापर झाल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेस सिस्टिममध्ये व्हायरस शिरल्याने संभावित धोका गृहित धरुन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी बॅंकांकडून फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येत आहे.
पुढील स्लाईडवर वाचा.... एसडीएफसीने काय सांगितले.... ब्लॉक झालेले कार्ड कसे सुरु करायचे... असे ठेवा तुमचे कार्ड सुरक्षित....
बातम्या आणखी आहेत...