आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांकडून हजारो कोटी रुपये काळा पैसा विदेशात पाठवण्याच्या प्रकरणाची सेबीकडून चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बँकांकडून हजारो कोटी रुपये काळा पैसा विदेशात पाठवण्याच्या प्रकरणात सेबीने चौकशी सुरू केली आहे. भांडवली बाजार नियामक आणि शेअर बाजार, बाजारातील नोंदणीकृत बँकांनी 'डिस्क्लोजर' नियमांचे उल्लंघन तर केले नाही ना, याची चौकशी करत आहे. या प्रकरणात दोषी बँकांवर दंड आकारला जाऊ शकतो.

बँक ऑफ बडोदाच्या एका शाखेतून जवळपास ६,१०० कोटी रुपये काळा पैस विदेशात पाठवण्यात आला होता. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय याची चौकशी करत आहे. या प्रकरणात एचडीएफसी बँकेच्या एका कर्मचाऱ्यासह काही जणांना अटक झाली आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या गाझियाबाद येथील एका शाखेनेही ५५० कोटी रुपये काळा पैसा विदेशात पाठवला. प्राप्तिकर विभाग आणि एसएफआयओचे अधिकारीही चौकशीत सहभागी आहेत.

सेबीच्या म्हणण्यानुसार, बँकांना आपल्या स्टाफच्या कामाची कल्पना आल्यानंतर त्यांनी शेअर बाजाराच्या माध्यमातून भागधारकांना याची माहिती देणे आवश्यक होते. त्यामुळे बँकांकडून स्पष्टीकरण मागण्यास सांगण्यात आले आहे. नियामकाने चौकशीही केली आहे.
दुसरीकडे बँकांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात त्यांना कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. त्यामुळे त्यांनी शेअर बाजारात काहीही माहिती दिली नाही. याशिवाय माहिती सार्वजनिक केल्यानंतर अंतर्गत चौकशीवरही परिणाम होऊ शकत होता.

कोणत्या बँकेने काय उत्तर दिले ?
बँक ऑफ बडोदा : प्रकरण जुलैमध्ये उघड झाले. चौकशीनंतर सीबीआय, ईडी आणि वित्त मंत्रालयाला माहिती देण्यात आली. कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. त्यामुळे शेअर बाजाराला माहिती देणे योग्य वाटले नाही. चौकशी केल्यानंतर निष्कर्षाची वाट पाहणे योग्य वाटले.

ओरिएंटल बँक : फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटला संशयास्पद व्यवहाराचा अहवाल देण्यात आला होता. पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती.
एचडीएफसी बँक : प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले जात आहे. अॅक्सिस बँकेने अद्याप कोणतेही उत्तर पाठवले नाही.
बातम्या आणखी आहेत...