आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Small, Medium Industrialists Get Half Price Land Apurva Chandra

लघु, मध्यम उद्योजकांना निम्या किमतीतच भूखंड, उद्योग सचिव चंद्रांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लघु-मध्यम उद्योजकांना (एसएमई) औद्योगिक वसाहतींमध्ये बाजारभावापेक्षा ५० टक्के कमी दराने भूखंड उपलब्ध करून दिले जातील. मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात राज्याचे उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांनी ही माहिती दिली. राज्यातील वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींत इच्छुक लघु उद्योजकांना दोन एकर जमिनीसाठी अर्ज करता येतील. त्यानुसार राज्य सरकार या जमिनीसाठी ५० टक्के सबसिडी देणार आहे. लघु उद्योजकांना सबसिडी देण्याच्या प्रक्रियेत सध्या येत असलेल्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यात येतील, असेही चंद्रा यांनी सांगितले.

एमअायडीसीकडील माेकळ्या भूखंडांचा औद्योगिक विकासाच्या दृष्टीने उपयोग व्हावा म्हणून त्या अशा उद्योजकांना देण्यात येणार आहेत. याबाबत चर्चा सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचेही ते म्हणाले. उद्योगांसाठी औद्योगिक वसाहतीच्या बाहेर जमीन देण्यात अडचण येत असल्याने स्थानिक जिल्हा पातळीवर हा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले. उद्योजकांना भूखंड खरेदीसाठी सबसिडी मंजूर असतानाही त्याचा लाभ उद्योजकांना मिळत नाही. यावर एका महिन्यात तोडगा काढण्यात येईल, असे चंद्रा म्हणाले.

जालना, सोलापूर, नागपूरमध्ये प्रतिसाद
राज्यात जालना, सोलापूर आणि नागपूर येथे सध्या असलेल्या औद्याेगिक वसाहतींमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी अनेक उद्योजकांनी रस दाखवला आहे. याबाबत अनेक प्रस्ताव असून लवकरच त्यांना मागणीप्रमाणे भूखंडांचे हस्तांतरण करण्यात येईल, असेही चंद्रा म्हणाले.