आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीच्या निर्णयामुळे डिसेंबर तिमाहीत स्मार्टफोनची विक्री स्थिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीमुळे मागील ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत स्मार्टफोन विक्रीमध्ये वाढ झाली नाही. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१५ मध्ये २.५८ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली. या आकड्यात वाढ झाली नाही; परंतु जुलै-सप्टेंबर २०१६ च्या तुलनेत विक्रीत २०.३ टक्के वाढ झाली. आयडीसी या संशोधनविषयक कंपनीच्या अहवालात यासंबंधीची माहिती देण्यात आली.

२०१६ मध्ये पूर्ण वर्षभरात १०.९१ कोटी स्मार्टफोन विकले गेले. २०१५ च्या तुलनेत हा आकडा ५.२ टक्क्यांनी जास्त आहे. आयडीसीच्या मते, पहिल्या सहामाहीमध्ये विक्री कमी होती. त्यानंतर नोटबंदीमुळेही विक्रीत वाढ झाली नाही. सप्टेंबरच्या तिमाहीत विक्रमी विक्री झाली होती. कंपनीच्या मते, २०१७ मध्ये अनेक कंपन्यांसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. मोठ्या कंपन्या छोट्या कंपन्यांचे अधिग्रहण करण्याची शक्यताही आहे.   

जगातील टॉप-५ कंपन्यांतून भारतीय कंपन्या पहिल्यांदा बाहेर पडल्या. भारतीय कंपन्या थ्रीजी फोन बनवण्यावर भर देत आहेत. या कंपन्या उत्पादनाऐवजी किमतीला जास्त महत्त्व देत आहेत. चीनच्या कंपन्यांचा दबदबा वाढत असल्याने स्थानिक कंपन्यांना आणखी झळ सोसावी लागणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

बाजारात स्मार्टफोन विक्रीचा विचार करता चीनच्या कंपन्यांची भागीदारी ४६ टक्के राहिली आहे. या कंपन्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत दुप्पट फोन विकले आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांची भागीदारी घटून १९ टक्क्यांपर्यंत आली आहे. 
 
८१ टक्के बाजार फीचर फोनचा  
२०१६ मध्ये एकूण १३.६१ कोटी फोन विकले गेले. यात ११ कोटी फीचर फोन होते. २०१७ मध्येही हाच ट्रेंड पाहायला मिळेल. स्वस्त फोर जी फोन उपलब्ध होत असल्याने कमी लोकच स्मार्टफोन घेण्यास इच्छुक असतील. फीचर फोनची बॅटरी दीर्घकाळ चालते तसेच फोनचे आयुष्यही बरेच असते. मागील वर्षी फीचर फोनची विक्री केवळ ९.४ टक्के घटली. त्या तुलनेत २०१५ मध्ये १६.२ टक्के घट नोंदवण्यात आली होती.   
 
बातम्या आणखी आहेत...