आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नॅपचॅट देऊ शकते फेसबुकला तगडे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०११ मध्ये स्टॅनफोर्डचे विद्यार्थी इव्हान स्पीगल आणि बॉबी मर्फी यांना जाणवले की, छायाचित्रांचे महत्त्व अतिशय कमी प्रमाणात जाणवते. याकडे फार कुणाचे लक्षच नाही. त्यामुळे त्यांनी स्नॅपचॅट बनवले. हे एक अॅप आहे. ज्यात पाठवलेले छायाचित्र एकदा पाहिले की ते गायब होते. स्नॅपचॅटचा अंदाज आहे की, फोटोग्राफी हे आता स्वतंत्र माध्यम असून त्यामुळे ते स्मृती नसून संपर्काचे माध्यम आहे. स्नॅपचॅटची मूळ कंपनी स्नॅप पूर्णपणे सोशल मीडिया कंपनीसारखी नाही. लाइक्स, कमेंट वा फॉरवर्डऐवजी तिचे मुख्य हत्यार ‘स्ट्रीक’ आहे. ही एक मोजणी आहे. तुम्ही आणि अन्य एका व्यक्तीने किती दिवस एकमेकांशी वैयक्तिक संपर्क केला?  याचा आधार अंतरंगात आहे. लोकप्रियता नव्हे. नावातूनच स्पष्ट होते की, स्नॅपचॅट दृश्याच्या टेक्सटिंगसाठी एक उपयोगी कंपनी आहे.
 
काही दिवसांपूर्वी स्नॅपचॅटचे सीईओ स्पीगल यांनी मला सांगितले की, स्मार्टफोनने इंटरनेटची जागा आता घेतली आहे. स्मार्टफोनची जागा कोण घेणार, हे आता शोधायचे आहे. सिलीकॉन व्हॅलीत अनेक लोकांनी याचा शोध सुरू केला आहे.फेसबुकच्या मार्क झुकेरबर्ग यांना वाटते की, याचे उत्तर व्हर्च्युअल रिअॅलिटी आहे. अॅमेझॉनचे जेफ बेजोस आवाजाच्या ओळखीवर पैज लावतात. तर स्पीगल यांना कॅमेऱ्यावर विश्वास आहे.
 
या विश्वासाचीच आता परीक्षा आहे. कारण, स्नॅपने आयपीओच्या माध्यमातून न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजकडे पावले वळवली आहेत. गेल्यावर्षी ३४४० कोटी रुपये तोटा पचवणाऱ्या स्नॅपची किंमत ६९५० अब्ज रुपये इतकी येणे कंपनीसाठी उल्लेखनीय आहे. सर्व्हे एजन्सी नीलसनच्या अनुसार १८ ते ३४ वर्षांच्या अर्ध्याहून अधिक व्यक्ती स्नॅपचॅटचा उपयोग करतात. ही संख्या कोणत्याही अन्य टीव्ही नेटवर्कहून सात टक्के अधिक आहे. दरदिवशी उपयोग करणारे लोक अॅप दिवसात १८ वेळा उघडून ३० मिनिटे पाहतात.
 
स्नॅपचॅटचा उपयोग ज्येष्ठही करत आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, अॅपचा वापर प्रतिदिवस १५ कोटी, ८० लाख व्यक्ती करतात. मात्र काही दिवसांपासून त्याची वाढ खुंटली आहे. स्नॅपचॅट आपल्या यूजर्ससाठी इतके जबरदस्त नियंत्रण आहे  की, साधारण छायाचित्र वा व्हिडिओबद्दलही ते सुरक्षितता अनुभवतात. त्यानंतर सर्वात वर टेक्स्टच्या रूपात सूचना ठेवू शकता. स्नॅपचॅट पहिल्यांदा लाँच झाले तेव्हा ज्येष्ठांनी अंदाज बांधला की, तरुणांसाठी नग्न फोटो पाठवणारे हे एक साधन ठरेल. मात्र, स्पीगलने हे जाणले की तरुणांना आपल्याला मन मोकळे करण्यासाठी सुरक्षित माध्यम पाहिजे.
 
सॅन डियागो राज्यात मनोविज्ञानाचे प्राध्यापक जीन ट्वेंगे यांचे म्हणणे आहे की, ‘किशोरवयीन सुरक्षेच्या मुद्यावर नेहमीच चिंतीत असतात. ते हे जाणतात की, स्नॅपचॅटवर विचित्र चेहरा बनवल्यास तो गायब होईल. त्यामुळे शाळेत त्यावर कोणीही आक्षेप घेणार नाही.’ स्नॅपचॅटमध्ये पैसे गुंतवणारी कंपनी व्हेंचर कॅपिटल फर्म जनरल केटालिस्टचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत तनेजा म्हणतात की, ‘फेसबुकला पूर्णपणे मोकळे ठेवल्यामुळे अराजकता वाढली आहे. स्नॅपचॅट प्रायव्हसीशी निगडित आहे.’ स्नॅपचॅटमध्ये संवाद इतके प्रायव्हेट आहेत की, मुले आपल्या माता-पित्याला फोन नंबर दिल्यासारखे स्नॅपकोड देतात.
 
केवळ मेसेज गायब होतात म्हणूनच स्नॅपचॅट उपयोगी नाही. इतर कंपन्यांनीही हा फंडा सुरुवातीला वापरून पाहिला. त्यात मेसेज इंटरनेटहूनच गायब होतो. समजा तुम्हाला हे जाणून घ्यायचे नाही की, डोनाल्ड ट्रम्प वा अन्य कोणी पाच मिनिटांपूर्वी काय बोलले, तरीही ट्विटर वा फेसबुकवर कोणीही तुम्हाला याची माहिती देईल. स्नॅपचॅट हे ट्रॉलिंग संदर्भात सर्वात सुरक्षित ऑनलाइन माध्यम आहे. आता फेसबुकच्या मर्यादा काय आहेत, हे समजत आहे. बजफीडचे उपवृत्तसंचालक रायन ब्रोडरिक म्हणतात, ‘फेसबुकच्या न्यूज फीडवर तुम्ही अचानक तुमच्या नातेवाईकांना भांडताना पाहाल. हे फक्त तुमच्या मित्रांपर्यंतच नाही तर मित्रांच्या मित्रांपर्यंतही पोहोचू शकेल. जर फेसबुकने स्नॅपचॅटच्या पुढे जाण्यासाठी काही केले नाही तर लोक फेसबुकचा उपयोग करतील. पण त्याची चिंता करणार नाही.’ संदेश फॉरवर्ड करण्यासाठी वा व्हायरल करण्यासाठीचे तंत्र नसल्यामुळे स्नॅपचॅट हे यू ट्यूब, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरप्रमाणे प्रसिद्धी किंवा पैसे कमावण्याचे साधन नाही. त्याबरोबर पैशाची एक समस्या आहे. मर्यादा असूनही जाहिरातदार स्नॅपबरोबर काम करण्यास इच्छुक आहेत. गेल्यावर्षी ७५ टक्के जाहिराती फेसबुक किंवा गुगलवर गेल्या. 
बातम्या आणखी आहेत...