पुणे- तरुणाईच्या कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एनएसडीसी) चे अभ्यासक्रम आता राज्यभरात विविध शहरांत उपलब्ध होणार आहेत. ‘सीड इन्फोटेक’शी यासंदर्भात नुकताच ‘एनएसडीसी’ने करार केला आहे. या करारानुसार एनएसडीसीचे सर्व अभ्यासक्रम आता सीड इन्फोटेकच्या सर्व प्रशिक्षण केंद्रांवर उपलब्ध असतील. या करारावर सीड इन्फोटेकचे सहसंस्थापक व अध्यक्ष श्रीकांत रासने आणि एनएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप चेनॉय यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी सीड इन्फोटेकचे संचालक नरेंद्र बऱ्हाटे, प्रकाश शर्मा उपस्थित होते.