आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर एकरांवर राज्यातील सर्वात मोठा "अॅपरेल पार्क', उत्पादनही झाले सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील तयार कपडे अर्थात अॅपरेल बाजारपेठेची सध्याची उलाढाल दाेन लाख काेटी रुपयांची असून येत्या पाच वर्षांत त्यात दुपटीने वाढ हाेण्याचा अंदाज अाहे. त्यासाठीच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून जवळ असलेल्या काेन गावामध्ये उभारण्यात अालेला ‘अस्मिता टेक्स्पा’ त्यात माेलाचे याेगदान ठरणार अाहे. शंभर एकर जागेवर उभारलेला हा राज्यातील सर्वात माेठा अॅपरेल पार्क अाहे.

तयार कपड्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी एक भव्य उत्पादन केंद्र उभारण्याची गरज हाेती. त्यादृष्टीने मुंबईपासून जवळ असलेल्या काेन गावाची निवड करण्यात अाली. केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या तंत्रज्ञान सुधारणा निधी याेजनेंतर्गत (टेक्नाॅलाॅजी अपग्रेडेशन फंड) या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यात अाली. काेन येथील एमअायडीसीच्या भूखंडावर हा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने २०१० मध्ये मंजुरी दिल्याची माहिती क्लाेदिंग मॅन्युफॅक्चरिंग असाेसिएशन संस्थेचे सचिव बाबूभाई अहिर यांनी दिली.

"अस्मिता टेक्स्पा’मध्ये दाेन युनिटमधून तयार कपड्यांचे उत्पादन सुरू झाले असून एका युनिटमधून कपड्यांची निर्यातही सुरू झाली अाहे. यंदाच्या डिसेंबरपर्यंत प्रकल्पातून ७५ टक्के, तर पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत संपूर्ण प्रकल्पातून उत्पादनाला सुरुवात हाेईल. क्लाेदिंग मॅन्युफॅक्चरिंग असाेसिएशनचे सदस्य या प्रकल्पाचे कार्यान्वयन करणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.

तयार कपडे निर्मिती उद्याेगात येण्यासाठी शिक्षण आणि वयाची गरज लागत नाही. प्रत्येक राज्यात लहान- माेठे तयार उत्पादक अाहेत. सध्या केवळ दहा टक्केच उद्याेग संघटित असून ९० टक्के असंघटित अाहे. या लहान उत्पादकांना एकत्र अाणण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अॅपरेल पार्कच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्मिती हाेऊन राज्याच्या महसुलात भर पडण्यास मदत हाेऊ शकेल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारचे तयार कपडे क्षेत्रात पुढील पाच वर्षांत पाच लाख राेजगार निर्मितीचे लक्ष्य अाहे. त्यादृष्टीने हा पार्क महत्त्वपूर्ण ठरणार अाहे.

पार्कमध्येच प्रशिक्षण केंद्र
तिसऱ्या टप्प्यात १२ एकर जागेवर हा प्लाझा उभारण्यात येईल. या ठिकाणी तयार कपड्याशी निगडित धागे, बटण, चेन, पॅकिंग साहित्य आणि अतिरिक्त कपड्यांची निर्मिती होणार आहे. विविध प्रकारचे तयार कपडे बनवणे शिकवण्यासाठी या पार्कमध्येच एक अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात अाले अाहे. अाधुनिक शिवणयंत्रांवर एकाच वेळी २०० महिला शिक्षण घेऊ शकतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देऊन त्यांना पार्कमध्येच नाेकरी मिळवून देण्याचा सीएमएअायचा मानस अाहे.

अॅपरेल पार्कची वैशिष्ट्ये
एकूण कंपन्या : ८०० (लहान-माेठ्या)
माेठे युनिट : ३४ (प्रत्येकी ३,५०० चाै.मी.)
लहान युनिट : ४४८ (प्रत्येकी २,००० चाैरस मीटर)

प्रकल्पाचे वैशिष्ट्य : फक्त तयार कपड्यांचे उत्पादन, विपणन अाणि निर्यात
एकूण राेजगार लक्ष्य : ३५,०००
प्रत्यक्ष राेजगार : ३०,०००
अप्रत्यक्ष राेजगार : २०,०००
काेन गावातील स्थानिक राेजगार िनर्मिती

अंमलबजावणी गरजेची
गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्र वस्त्र िनर्मितीमध्ये पहिल्या क्रमांकावर अाहे. पण मधल्या काळात धाेरणांमुळे समस्या िनर्माण झाल्या. अाता केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार अाहे. त्यामुळे याेग्य ते धाेरणात्मक िनर्णय घेऊन त्यांची जलद अंमलबजावणी केली तर महाराष्ट्र पुन्हा पहिला क्रमांक पटकावेल, असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला.

देशातील कापड निर्यातीचे भविष्य अाशावादी
बांगलादेश आणि चीन या स्पर्धक देशांमध्ये पायाभूत सुविधांच्या समस्या तसेच कामगारांचा वाढता माेबदला या समस्या अाहेत. त्यामुळे भारतासाठी कापड िनर्यातीचे भविष्य अाशावादी अाहे. गेल्या वर्षातील ९०,७९० काेटी रुपयांची निर्यात १.०३ लाख काेटी रुपयांवर गेली अाहे.

आणखी प्रस्ताव तयार
सांगली, बारामती येथे अॅपरेल पार्क सुरू अाहे. वसई, नागपूर, नाशिक येथे अशा प्रकारचा पार्क उभारण्याचा प्रस्ताव सरकारला िदला अाहे; परंतु त्याला अद्याप मंजुरी िमळाली नसल्याचे अहिर यांनी सांिगतले.