आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिमॅट खाती उघडण्यासाठी सवलत प्रोत्साहन योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जास्तीत जास्त रिटेल गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडे अाकर्षित करण्यासाठी लहान शहरांमध्ये डिमॅट खाती उघडण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार सेबी करीत अाहे. त्याचाच एक भाग म्हणून ही डिमॅट खाती उघडली जावीत यासाठी ब्रोकर्स तसेच बाजारातील अन्य सहभागीदारांना सवलती देण्याचा प्रस्ताव ठेवला अाहे.

या प्रस्तावांतर्गत शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते उघडायचे असल्यास खाते उघडण्याचा खर्च, विशेषकरून मूळ डिमॅट खाते सेवेसाठी येणा-या खर्चात सवलत देण्याचा विचार अाहे. या सवलतीची रचना अशा प्रकारे असेल, जेणेकरून अधिकाधिक खाती उघडली जावीत यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपेंटसना प्रभावीपणे काम करता येण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळू शकेल. देशातील सर्व डिमॅट खात्यांसाठी कस्टोडियन म्हणून काम करणा-या एनएसडीएल अाणि सीडीएसएल या दाेन डिपाॅझिटरींकडून बाजार नियंत्रकांनी मते मागवली हाेती. त्या अाधारावर सेबीच्या डिपाॅझिटरी यंत्रणा अाढावा समितीने या प्रस्तावाची पहिल्यांदा शिफारस केली अाहे. पुढची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

द्वितीय-तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये विस्तार
डिपॉझिटरी सहभागीदारांची गरज पूर्ण करण्यासाठी द्वितीय अाणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये प्रामुख्याने विस्तार करण्यात अार्थिक सर्वसमावेशकता साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार अाहे. त्या दृष्टीने प्राेत्साहन सवलत कशी देता येईल याची अाखणी करण्यात येणार अाहे. बँकांच्या डिपाॅझिटरी पार्टिसिपेंट्सचे जाळे माेठ्या प्रमाणावर असून त्यांचे या शहरांमध्ये चांगले स्थान अाहे. त्यामुळे तेदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.