आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशातील यशवंत - परदेशात रिटेल व्यवसायात जम बसवणारे भारतीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपूर्व मेहता यांनी दोन वर्षांपूर्वी अॅमेझॉनची नोकरी सोडून किराणा डिलिव्हरी स्टार्टअप सुरू केली. त्यांच्या कंपनीने इन्स्टाकार्टने सॅन फ्रान्सिस्को, माउंटन व्ह्यू आणि पॉलो आल्टोमध्ये सेवा सुरू केल्या. फोर्ब्जने या कंपनीला "मोस्ट प्रॉमिसिंग कंपनी इन अमेरिका'(सर्वांत विश्वासार्ह कंपनी) संबाेधले आहे. कंपनीमध्ये जवळपास २०० कर्मचारी आहेत.
अपूर्व यांच्या म्हणण्यानुसार, वास्तवातील अडचणी कळल्यानंतर कंपनीची सुरुवात केली. कामावरून परतल्यानंतर त्यांच्या फ्रिज मोकळे झालेले असायचे. कामावरून परतल्यानंतर आलेल्या थकव्यामुळे काही खरेदी करावे, अशी अवस्था राहत नव्हती. त्यांच्याकडे ना गोदाम आहे ना ट्रक. ते आपली सेवा सुपरमार्केटशी जोडतात. यामध्ये अर्धवेळ कामगार आणि त्यांच्या कारचा वापर केला जातो. अशा पद्धतीच्या मॉडेलमुळे त्यांना रात्रीतून इतरांपेक्षा पुढे आणले. त्यांच्याकडे २ अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे. त्यांची कंपनी आता अमेरिकेतील दहा शहरांत कार्यरत आहे.
अपूर्व मेहता | उद्यमशील
अमेरिकेतील सर्वांत विश्वासार्ह कंपनी चालवणारी व्यक्ती
वय - २७ वर्षे शिक्षण - ओंटारियो विद्यापीठ, वॉटरलूमधून पदवी
चर्चेत - ते फोर्ब्जच्या यादीत ४० व्या क्रमांकावर आले आहेत.
कार्यपद्धती अशी
कोणत्याही गॅजेटवर आवडीच्या स्टोअरवर किराणा सामान ऑनलाइन मागणी नोंदवल्यानंतर काही वेळातच हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातलेली एखादी व्यक्ती तुमच्या घराबाहेर उभा राहिलेला दिसेल.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, व्यावसायिक एम. ए. युसूफ अली यांच्‍याबाबत..