आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलाद उद्योगाला दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सपाट आणि लांब आकाराच्या पाेलाद उत्पादनावर सर्वाधिक आयात शुल्क लागू करण्यात आल्यामुळे देशातील पाेलादाच्या किमतीवरील ताण कमी हाेणार आहे. चीनसारख्या देशाकडून स्वस्त आयात हाेत असल्याने पाेलादाच्या किमती कमी हाेतील, अशी अपेक्षा ‘मुडीज’ या पतमानांकन संस्थेने व्यक्त केली आहे.

देशात स्वस्त आयातीचे प्रमाण जवळपास ७० टक्के असून त्यातही एकतृतीयांश आयात चीनकडून हाेत आहे. त्यामुळे गेल्या १२ महिन्यांमध्ये पाेलादाच्या किमतीत जवळपास २७ टक्क्यांनी घट झाली आहे. केंद्र सरकारने पाेलादावरील सीमाशुल्कामध्ये २.५ टक्क्यांनी वाढ केल्यामुळे देशातील उत्पादकांना गेल्या आठवड्यात माेठा दिलासा मिळाला. कार्बन स्टील उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील या दाेन कंपन्यांना मुडीजने सकारात्मक पतदर्जा दिला आहे. स्वस्त आयातीमुळे टाटा स्टीलच्या पाेलाद िकमतीत प्रतिटन सहा टक्क्यांनी घट झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...