आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर १.९३ रुपयांनी महाग, दुसरी दरवाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वयंपाकाच्या अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत सोमवारी १ रुपया ९३ पैशांनी वाढवण्यात आली. एक महिन्यातील ही दुसरी दरवाढ असून स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी कमी करण्याच्या दिशेने सरकारने टाकलेले हे पाऊल आहे. यापूर्वी १ जुलै रोजी १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १.९८ रुपयांनी वाढवण्यात आली होती. एलपीजी आणि केरोसीनवरील सबसिडी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने डिझेलवरील सबसिडी कमी करण्यासाठी अवलंबलेला मार्गच अवलंबला आहे.

मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये यूपीए सरकारने डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय घेेतला होता. त्यानुसार सबसिडी कमी करण्यासाठी दर महिन्याला प्रतिलिटर ५० पैसे दरवाढ सुरू करण्यात आली होती. एलपीजी सिलिंडरची किंमतही दरमहा दोन रुपयांनी वाढवण्यामागे सरकारचा तोच उद्देश आहे.
बातम्या आणखी आहेत...