आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरघोस उत्पादनामुळे हरभरा डाळीचे भाव राहतील स्थिर, तुरीचीही बंपर अावक सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील अाडत बाजारात नवीन  हरभरा, गहू, ज्वारीची अावक सुरू झाली असून भाव साधारण मिळत अाहेत, तर दुसरीकडे साेयाबीनला २५०० ते २६५० रुपयांपर्यंत भाव मिळत असून परळीच्या माेंढ्यात राेज एक हजार क्विंटल अावक हाेत अाहे. बीडमध्ये अावक नगण्य अाहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत बंपर अावक पाहता  हरभऱ्याचे भाव स्थिर राहतील, असे व्यापारी सूत्रांचे म्हणणे अाहे.  
 
सरत्या आठवड्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे निकाल तसेच परळीत महाशिवरात्रीमुळे व गेवराईत बाजारा समितीच्या निवडणुकीमुळे अाडत बाजारात अन्नधान्याची अावक कमी हाेती. परळी येथील बाजारात नवीन  हरभऱ्याची अावक सुरू झाली असून राेज सातशे क्विंटल अावक हाेत अाहे. भाव दर्जानुसार ४२५० ते ४३५० रुपये अाहेत. सोयाबीनची राेज एक हजार क्विंटल अावक हाेत असून २६५० ते २७५० रुपये भाव मिळत अाहे.
 
नवीन गहू अाणि ज्वारीची अावक मात्र अद्याप सुरू झाली नसून गेवराई बाजार समितीच्या निवडणुकीमुळे व्यापार थंडच हाेते. नवीन ४९६ वाणाच्या गव्हाची अावक सुरू झाली असून भाव १८०० ते २००० रुपये क्विंटलप्रमाणे मिळत अाहेत. 
 
शाळू ज्वारीची अावक कमी असून भाव १७०० ते २००० रुपये अाहेत. चालू आठवड्यात अावक वाढण्याची शक्यता अाडत व्यापारी अजित काला यांनी बाेलून दाखविली. बीडच्या बाजारात ७०७०, ४९६, अजित, लाेकवन वाणाच्या गव्हाची अावक स्थानिक भागातून सुरू झाली अाहे. राेज दाेनशे ते तीनशे कट्टे (१५० क्विंटल) अावक हाेत अाहे. अाटा मिलकडून मागणी असलेल्या गव्हाला १५०० ते १६०० पर्यंत भाव अाहे. दर्जेदार गव्हाचे भाव १९०० ते २३०० रुपयांपर्यंत हाेते, तर ज्वारीची अावक दाेनशे ते २५० क्विंटल हाेत अाहे. ज्वारीला सध्या १८०० ते २०२५ रुपयांपर्यंत भाव मिळत अाहेत.   
 
डाळीचे भावही स्थिरावणार  
मागील दाेन वर्षे  हरभऱ्याचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात  हरभरा डाळीचे भाव १७० रुपयांपर्यंत पोहोचले हाेते. मात्र या वर्षी चांगल्या पाऊसमानामुळे हरभऱ्याचेही तुरीप्रमाणे बंपर पीक अाहे. सध्या किरकोळ बाजारात  हरभरा डाळीचे भाव ७० रुपये किलाे अाहेत. बेसनपिठाची राेजची मागणी माेठ्या प्रमाणात असते. यंदा उत्पादन माेठ्या प्रमाणात असल्याने  हरभऱ्याचे दर स्थिरावतील असे व्यापाऱ्यांना वाटते.     
 
तुरीची बंपर अावक सुरूच   
यंदा नाफेडमार्फत तुरीची खरेदी ५०५० रुपये क्विंटल भावाने सुरू अाहे. खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी अाणली अाहे. या केंद्रावर वजनकाट्याची कमतरता, मापासाठी हाेणारा विलंब, बारदान्याचा तुटवडा तसेच गोदाम अपुरे पडत असल्याने तुरीची खरेदी अनेकदा बंद करावी लागली. पुरेशी व्यवस्था केल्यानंतर पुन्हा तूर खरेदी सुरू झाली. दरम्यान, बंपर अावक पाहता शासनाच्या विविध विभागांची गोदामे उपलब्ध होतील काय या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या अाहेत.

हरभऱ्याचे भाव स्थिर राहतील  : बाजारात नवीन  हरभऱ्याची अावक सुरू झाली अाहे. शासनाचा हमी भाव ४२०० रुपये अाहे. खुल्या बाजारात २४५० ते ४३०० रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळत असल्याचे बीड येथील अाडत व्यापारी विष्णुदास बियाणी यांनी सांगितले.  हरभऱ्याच्या भावात तेजीची शक्यता कमी असून काही दिवस  भाव स्थिर राहतील, असे परळीचे अाडत व्यापारी महावीर काेटेचा यांनी  सांगितले.   
 
 
बातम्या आणखी आहेत...