आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेवर अायात शुल्क २५ वरून ४० टक्के

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उसाच्या थकबाकीचा बाेजा २१ हजार काेटींपर्यंत गेला अाहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची थकबाकीची रक्कम िनश्चित करण्याच्या दृष्टीने साखरेवरील अायात शुल्क ४० टक्क्यांनी वाढवण्याचा िनर्णय केंद्र सरकारने घेतला अाहे. याअगाेदर साखरेवर २५ टक्के अायात शुल्क हाेते. त्याच्याच जाेडीला इथेनाॅलवरील अबकारी शुल्कदेखील रद्द करण्यात अाले अाहे. यामुळे साखरेच्या िकमतीला अाधार िमळण्याची शक्यता अाहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी साखरेवरील अायात शुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा तसेच इथेनाॅलवरील अबकारी शुल्क रद्द करण्याचा िनर्णय घेण्यात अाला असल्याचे अन्नधान्यमंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी लाेकसभेत सांिगतले. िनर्यात जबाबदाऱ्याचा कालावधी अाता सहा महिन्यांपर्यंत करण्यात अाला अाहे.
शेतकऱ्यांना थकबाकीची रक्कम देण्यासाठी साखर कारखान्यांवर २१ हजार काेटींचा भार अाहे. त्याचबराेबर साखरेचा बफर स्टाॅक करण्यासाठी सरकार जलद काम करत अाहे. साखरेची शुल्कमुक्त अायात प्रमाणीकरण याेजना मागे घेण्याचा िनर्णयही सरकारने घेतला अाहे. या याेजनेअंतर्गत िनर्यातदार शुल्कमुक्त कच्ची साखर अायात करत हाेते. इथेनाॅलवर सध्या १२.३६ टक्के केंद्रीय अबकारी कर असून ताे अाता रद्द करण्यात अाला अाहे.

साखरेच्या िकमतीत लक्षणीय घट झाल्यामुळे साखर कारखान्यांवरील थकबाकीचा भार माेठ्या प्रमाणावर वाढला अाहे. देशात अतिरिक्त साखर उत्पादन हाेण्याचे हे सलग पाचवे वर्ष अाहे. रामविलास पासवान यांनी याच महिन्यात प्रमुख साखर उत्पादक राज्यांमधील उद्याेग, शेतकरी संघटना अाणि राज्य सरकार यांच्याबराेबर एक बैठक घेतली हाेती. या बैठकीत राज्य सरकारांनी पांढऱ्या साखरेवर िनर्यात अनुदान, २० लाख टन साखरेचा बफर साठा तयार करणे, इथेनाॅलवर जास्त अनुदान देण्याची मागणी केली हाेती.
साखर उत्पादन वाढणार
सरकारी अंदाजानुसार २०१४-१५ या साखर वर्षामध्ये २६५ लाख टन साखरेचे उत्पादन हाेण्याची शक्यता अाहे. मागील वर्षात देशात २४३ लाख टन साखर उत्पादन झाले हाेते. एक अाॅक्टाेबरला साखरेचा खुला साठा ७५ लाख टन हाेता. यंदा देशात २४८ लाख टन साखरेचा वापर हाेण्याची शक्यता अाहे.
सरकारने २७ लाख टन साखर खरेदी करावी : इस्मा
साखर कारखानदारांची संघटना इस्माने आयात शुल्कात वाढ आणि इथेनॉलवरील उत्पादन शुल्क रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र याचा कारखान्यांना याचा लाभ मिळण्यास विलंब लागणार आहे. तात्काळ दिलासा मिळण्यासाठी सरकारने उत्पादनाच्या १० टक्के भाग खरेदी केला पाहिजे. साखरचे भाव सध्या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहेत. यामुळेच ही अडचण आली आहे. सध्या १० हजार कोटी रुपयांची ३५ लाख टन अतिरिक्त साखर पडून आहे.