आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कर नंदनवनां'वर कारवाई करा, जेटली यांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंगटन - करचाेरी करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या देशांविरुद्ध ( टॅक्स हेव्हन्स) कडक कारवाई करण्याची मागणी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) तसेच इतर आंतरराष्ट्रीय अार्थिक संस्थांच्या वतीने आयोजित जी-२० देशांचे अर्थमंत्री आणि प्रमुख बँकांचे गव्हर्नरांच्या बैठकीत ते बोलत होते. पनामा पेपर प्रकरणादरम्यान त्यांच्या या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बैठकीनंतर जी-२० च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकातदेखील या विषयाचा समावेश करण्यात आला. जी -२० देश पुन्हा एकदा वित्तीय कारवाई कार्य बल (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) च्या नियमांना पूर्णपणे लागू करण्याची आवश्यकता व्यक्त करत असून यातून पारदर्शकता वाढवता येईल, असे मत पत्रकात व्यक्त करण्यात आले आहे. करचोरी आणि दहशदवादाला आर्थिक मदत करणाऱ्यांचा हवाला देत देशांनी माहितीचे आदान-प्रदान करणे आवश्यक असल्याचे मतही जी - २० च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात व्यक्त करण्यात आले आहे.
जास्त मताधिकाराची मागणी
आयएमएफच्या वतीने पुढील कोटा सुधारणा ऑक्टोबर २०१७ पर्यंत लागू करण्यात येण्याच्या निर्णयाचे अर्थमंत्र्यांनी स्वागत केले. या नव्या मताधिकारात विकसनशील देशांच्या जीडीपीनुसार त्यांची भूमिका आणि मताधिकारात वाढ होणे आवश्यक असल्याचे जेटली यांनी सांगितले. आयएमएफप्रमाणेच जागतिक बँकेने कोटा सुधारणा करून विकसनशील देशांना जास्त मताधिकार देण्याची मागणी केली.
पुढे वाचा.. मल्ल्यांचे व्यवसाय मॉडेल चुकीचे : अरुण जेटली