आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीसीएस 2004 मध्ये ‘लिस्टिंग’नंतर पहिल्यांदाच करणार शेअर ‘बायबॅक’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस शेअर बायबॅक म्हणजेच शेअर पुनर्विक्रीच्या निर्णयावर विचार करत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये किती शेअर बायबॅक करणार या संबंधीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
 
टीसीएसची २००४ मध्ये लिस्टिंग झाली होती. त्यानंतर कंपनी पहिल्यांदाच बायबॅक करणार आहे. वास्तविक तंत्रज्ञानावर आधारित अनेक कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले आहेत. गुंतवणूकदार लाभांश वाढवण्याची किंवा बायबॅकची मागणी करत आहेत. डिसेंबर २०१६ पर्यंत टीसीएसकडे नगदी ४३,१६९ कोटी रुपये होते. यासंबंधी टीसीएस प्रमुख एन. चंद्रशेखरन यांनी बुधवारी नॅसकॉमच्या एका कार्यक्रमात माहिती दिली. गुंतवणूकदारांनी लाभांश किंवा बायबॅक धोरणावर विचार करण्याचा सल्ला दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...