आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीसीएस ‌ठरली सर्वाेत्कृष्ट कंपनी, रिलायन्स दुसऱ्या तर आयटीसी तिसऱ्या स्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी टीसीएस भारतातील सर्वोत्कृष्ट कंपनी ठरली आहे. डन अँड ब्राॅडस्ट्रीट (डीअँडबी) ने विविध आर्थिक आणि कार्यान्वय मानकांच्या आधारे टीसीएसची क्रमांक एकची कंपनी म्हणून निवड केली आहे. व्यावसायिक माहिती देणारी कंपनी डन अँड ब्राॅडस्ट्रीटने भारतातील ५०० कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. भारत आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर गेल्या १२ ते १८ महिन्यांत विश्वास वाढला असल्याचे कंपनीचे एमडी कौशल संपत यांनी यादी जाहीर करताना सांगितले.

उत्पन्नाची गती कमी
डीअँडबीच्या मते, या ५०० कंपन्यांची टॉप लाइन ग्रोथ (विक्री आणि उत्पन्न) आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ८.७ टक्के कमी झाले आहे. दबाव आणि मागणी नसल्यामुळे ही घट झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या कंपन्यांचा कर भरल्यानंतर नफा ८.६ टक्के कमी झाला आहे.

सर्वोत्कृष्ट १० कंपन्या
यादीत रिलायन्स दुसऱ्या तर आयटीसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त ओएसजीसी चौथ्या, कोल इंडिया पाचव्या, इंफोसिस सहाव्या, एचडीएफसी बँक सातव्या, एचडीएफसी आठव्या, हिंदुस्तान युनिलिव्हर नवव्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया दहाव्या स्थानावर आहे. या नव्या यादीत ५१ नव्या कंपन्यांचा समावेश झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...