आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्‍या टॉप 10 बिजनेस Group मध्‍ये टाटा समूह अव्‍वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटा समूह - Divya Marathi
टाटा समूह
नवी दिल्‍ली - भारताच्‍या टॉप 10 बिझनेस रॅकिंगमध्‍ये टाटा समुह टॉपवर आहे. टाटा समुह गेल्‍या अनेक वर्षांपासून भारतीय लोकांचा पसंतीचा ब्रँड बनला आहे. टॉप ब्रँडवर रिपोर्ट सादर करणारी कंपनी 'कन्‍सल्‍टंट ब्रँड फायनान्स'च्‍या सर्व्हेनुसार टाटा समुह दुस-यांदा भारतीय लोकांचे पहिल्‍या पसंतीचे ब्रँड ठरले आहे. गेल्‍या वर्षीही टाटा समुह कंपनी टॉपवर होती. मागील वर्षी तिस-या क्रमांकावरील 'एसबीआय' यावर्षी दुस-या क्रमांकावर आहे.
टाटा समूह
टाटा समूह एक मोठा व्‍यावसायीक समूह आहे. समूहाचे मुख्‍यालय मुंबई येथे आहे. सध्‍या टाटा समुहाचे अध्‍यक्ष सायरस मिस्‍त्री आहे. रतन टाटा यांनी 28 डिसेंबर 2012मध्‍ये सायरस मिस्‍त्री यांना आपले उत्‍तराधिकारी म्‍हणून निवड केली होती. ते गेल्‍या 50 वर्षापासून या समूहामध्‍ये आहेत. रतन टाटा 21 व्या वर्षी टाटा समूहाचे अध्‍यक्ष झाले. हा समूह इंजीनिअरिंग (engineering), माहिती तंत्रज्ञान (information technology), संवाद (communications), ऑटोमोबाइल (automotive), रासायनिक उद्योग (chemicals), ऊर्जा (energy), सॉफ्टवेअर, हॉटेल, स्‍टील (steel) आणि उपभोक्ता सामग्री आदी क्षेत्रामध्‍ये कार्यरत आहे.
ब्रँड व्‍हॅल्‍यू :15. 4 बिलियन डॉलर (97020 करोड रुपये)
रँक 2015 : 1
रँक 2014: 1

पुढील स्‍लाईडमध्‍ये वाचा टॉप 10 मध्‍ये कोणाचा समावेश आहे ते...
बातम्या आणखी आहेत...