आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मराठी माणसाने अंबानी-बिर्लांना चारली धूळ, आज आहे 1.70 लाख कोटींची कंपनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अचानक फोन येतो. हजारो कोटी रुपयांच्या कंपनीच्या टॉप बॉसला सांगितले जाते, की आपला मालक बदलला आहे. असे देशाची बलाढ्य कंपनी लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) सोबत झाले होते. हा किस्सा १९९० च्या दशकाचा आहे. या कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीजने तीन वेळा तर कुमार मंगलम बिर्ला यांनी एका वेळी होस्टाईल टेकओव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. पण चारही प्रयत्न अपयशी झाले. त्यानंतर कंपनी आणखी मोठी झाली. आज या कंपनीचे बाजारमुल्य सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे आहे. ए. एम. नाईक या कंपनीचे टॉप बॉस आहेत.

 

नाईक यांच्या बायोग्राफीच्या प्रकाशनाच्या वेळी जुन्या प्रसंगांना उजाळा मिळाला. यावेळी प्रकाशनाला उपस्थित असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि बिर्ला ग्रुपचे कुमार मंगल बिर्ला दोघेही गालातल्या गालात हसत होते. यावेळी अंबानी यांनी नाईक यांना ट्रुली मॅन इन इंडिया असे म्हटले.

 

बायोग्राफी द नॅशनलिस्टचे प्रकाशन
प्रकाशन सोहळ्यात नाईक यांनी काही जुने प्रसंग सांगितले. ते म्हणाले, की २००१ मध्ये मी शिकागोला एका कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा मला एल अॅण्ड टी सिमेंट बिझनेसचे हेड मोहन करनानी यांचा फोन आला. त्यांनी सांगितले, की आपले मालक बदलले आहेत. आता ही कंपनी दुसऱ्या मालकाची झाली आहे. तेव्हा रिलायन्सपासून बिर्ला यांनी सगळी इक्विटी कॅशमध्ये खरेदी केली होती.

 

त्यानंतर जरा वेळाने रिलायन्सचे तत्कालिन डायरेक्टर अनिल अंबानी यांचा फोन आला. तुम्हाला आम्ही आवडत नाही. आम्ही या कंपनीतून जात आहोत. आम्ही सगळी इक्विटी बिर्लांना विकली आहे. त्यानंतर बिर्ला यांचा फोन आला. ते म्हणाले, की तुम्ही आमच्या जवळ येत नव्हते. त्यामुळे आम्हीच तुमच्या जवळ आलोय.

 

पुढील स्लाईडवर वाचा... कसा खेळण्यात आला हा कार्पोरेट डावपेच... एका मराठी माणसाने तो कसा उधळून लावला....

बातम्या आणखी आहेत...