Home | Business | Industries | this one liter water bottle is costlier than 2 mercedes gla

पाण्याच्या या एका बटलीच्या किमतीत येतील 2 मर्सेडीज, भारतात होणार लॉन्च

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 05, 2017, 05:32 PM IST

या पाण्याच्या 1 लीटर बाटलीची किंमत एवढी आहे, की त्यामध्ये 2 मर्सेडीज कार खरेदी केल्या जाऊ शकतील.

 • this one liter water bottle is costlier than 2 mercedes gla
  नवी दिल्ली - एक लीटर पाण्याची किंमत किती असू शकेत याचा अंदाज लावल्यास आपण जास्तीत-जास्त 100-200 किंवा हजार रुपयांपर्यंत अंदाज लावू शकतो. मात्र, भारतात लवकरच पाण्याचा एक लग्जरी ब्रँड लॉन्च होत आहे. या पाण्याच्या 1 लीटर बाटलीची किंमत एवढी आहे, की त्यामध्ये 2 मर्सेडीज कार खरेदी केल्या जाऊ शकतील. भारतात मर्सेडीज जीएलएची किंमत 32 लाखांच्या जवळपास आहे. पण, पाण्याच्या या एका बॉटलची किंमत 65 लाख रुपये राहणार आहे.

  अॅप बेस्ड टॅक्सी सेवा देणारी कंपनी उबर भारतात हा ब्रँड लॉन्च करत आहे. याचे नाव बेवरली हिल्स 90H2O असे आहे. जुन्या दारुच्या बाटल्यांची प्रेरणा घेऊन ह्या पाण्याच्या बाटल्या विकल्या जाणार आहेत. जुन्या दारुच्या बाटल्या जसे तुमचे स्टाइल स्टेटमेंट वाढवतात. त्याच पद्धतीने पाण्याच्या ह्या बॉटल्स सुद्धा आपले वैभव आणि श्रीमंती दाखवणार आहे.
  जग्वारची किंमत याहून कमीच
  बेवरली हिल्सची पाण्याची ही बॉटल टाटा जग्वारपेक्षा महाग आहे. भारतात जग्वार XF ची शोरूम किंमत 46 लाख आहे.
  पुढील स्लाइड्सवर, 250 हिऱ्यांनी सजलेले सोन्याचे झाकण...
 • this one liter water bottle is costlier than 2 mercedes gla
  या बॉटलचे झाकण सोन्याचे असून त्यावर एक पांढरे हिरे आणि 250 इतर हिरे लावण्यात आले आहेत. 
 • this one liter water bottle is costlier than 2 mercedes gla
  कॅलिफोर्निया येथे या कंपनीचे मुख्यालय आहे. तेथील वॉटरफॉलचे पाणी यात वापरले जाते. पाण्याचा स्वाद खास असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Trending