आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच नव्हे तर मुलांनाही पेन्शन देते ही स्कीम, असा उचला फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हाला याची माहिती आहे, की ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारी कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पीएफसह पेन्शन म्हणजेच इम्प्लॉईज पेन्शन स्कीममध्येही (ईपीएस) योगदान देत असते. या पेन्शनचा लाभ कर्मचाऱ्याला रिटायरमेंटनंतर मिळतो. पण यासाठी कर्मचाऱ्याने कमीत कमी १० वर्षे निरंतर नोकरीत असणे आवश्यक आहे. तसेच कर्मचारी पूर्णपणे डिसेबल झाला तरी ही पेन्शन घेण्यास पात्र असतो. यात केवळ कंपनी योगदान देत असते. इम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडमध्ये (पीएफ)कंपनीद्वारे केल्या जाणाऱ्या १२ टक्के योगदानाच्या ८.३३ टक्के याची रक्कम असते. तसेच सरकारही यात योगदान देते. हे बेसिक सॅलरीच्या १.१६ टक्क्यांपेक्षा जास्त नसते.

 

पण ही पेन्शन स्कीम केवळ कर्मचाऱ्यांना पेन्शन देत नाही. त्याच्या मृत्यूनंतर पत्नी, पती किंवा मुलांना पेन्शनचा लाभ मिळतो. याला फॅमिली पेन्शन म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की ईपीएस अंतर्गत फॅमिली पेन्शनचा लाभधारक कोण कोण असू शकतो. केव्हापर्य़ंत त्यांना या पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, या स्कीमची अतिरिक्त माहिती....

बातम्या आणखी आहेत...