आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year India's Development Rate By 7.5 Per Cent

यंदा ७.५%, पुढील वर्षी ७.७% राहील भारताचा विकास दर - जागतिक बँकेचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) विकास दर यंदा ७.५ टक्के तर पुढील वर्षात ७.७ टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. निव्वळ भारताच्या जोरावर पूर्ण दक्षिण आशियाचा वृद्धी दर २०१६ मध्ये ७.१ टक्के आणि २०१७ मध्येे ७.३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असेही बँकेने म्हटले आहे. साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस या अहवालात बँकेने म्हटले आहे की, भारतात खासगी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ होईल. यामुळे कंपन्यांचा ताळेबंदही सुधारलेला राहील. अहवालानुसार कृषी उत्पादन वाढीने तसेच सातव्या वेतन आयाेगाच्या शिफारशी लागू झाल्याने विकास दरात वाढ होईल. मात्र महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांतील विलंबामुळे गुंतवणूकदारांची भावना काहीशी नाराजीची राहील. शहरी आणि ग्रामीण कुटुंबे, देशी आणि विदेशी मागणी, सरकारी आणि खासगी गुंतवणूक यांच्यातील फरक मोठा आहे. हा फरक कमी करायला हवा.

जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष एनेट डिक्सन यांनी सांगितले, बड्या अर्थव्यवस्थांशी कमी प्रमाणात जोडलेली असल्याने जागतिक संकटापासून दक्षिण आशिया बऱ्यापैकी वाचलेला आहे. कच्च्या तेलाच्या घटत्या किमती मदतीला आहेतच. मात्र महसुली आणि वित्तीय तुटीचे सावट आहे. अधिक महसुलाद्वारे देशांनी यावर तोडगा काढायला हवा.
दरवाढीस पूरक बाबी
भारतात खासगी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ होईल. यामुळे कंपन्यांचा ताळेबंदही सुधारलेला राहील. अहवालानुसार कृषी उत्पादन वाढीने तसेच सातव्या वेतन आयाेगाच्या शिफारशी लागू झाल्याने विकास दरात वाढ होईल.

श्रीलंका : दोन्ही वर्षी ५.३% वाढ
श्रीलंकेत २०१६ आणि २०१७ मध्ये विकास दर ५.३ टक्के राहण्याची शक्यता आहे. यात सरकारी गुंतवणुकीचा वाटा जास्त राहील. जागतिक संकटामुळे श्रीलंकेची निर्यात घसरली आणि भांडवल बाहेर गेले आहे.

पाकिस्तान : ४.५%आणि ४.८ %
पाकिस्तानात यंदा विकास दर ४.५ टक्के राहील. पुढील वर्षी हा दर ४.८ टक्क्यांवर पोहोचू शकतो. या वाढीत औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा वाटा जास्त राहील.

चीन : ६.७ टक्के आणि ६.५ टक्के
जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या अर्थव्यवस्थेचा विकास दर २०१६ मध्ये ६.७ टक्के राहील, २०१७ मध्ये तो घटून ६.५ टक्के राहील. मॅन्युफॅक्चरिंग आणि रिअॅल्टी क्षेत्रातील मरगळीमुळे ही वेळ येणार आहे. एडीबीने मागच्या आठवड्यात यंदा ६.५ टक्के तर पुढील वर्षात ६.३ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता.