नवी दिल्ली - शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित तीन व्यक्तींची निवड चलन धोरण समितीवर करण्यात आली आहे. यामध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे चेतन घाटे, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पम्मी दुआ आणि आयआयएम अहमदाबादचे रवींद्र ढोलकिया यांचा समावेश आहे. यांची नियुक्ती चार वर्षांसाठी झाली आहे. सहा सदस्य असणाऱ्या या समितीमध्ये सरकारच्या वतीने तीन, तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने तीन सदस्य असतील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या समितीचे प्रमुख असतील. रिझर्व्ह बँकेच्या वतीने एक डेप्युटी गव्हर्नर तसेच एक इतर सदस्य असेल.