आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टाइम' नियतकालिक: उमेशच्या सॉफ्टवेअरला समजतात २५ भाषा, १५० बोली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमेश सचदेव, सॉफ्टवेअर इंजिनीअर - Divya Marathi
उमेश सचदेव, सॉफ्टवेअर इंजिनीअर
न्यूयॉर्क - प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नियतकालिक 'टाइम'ने सहस्राब्दीच्या १० युवा उद्यमींची यादी तयार केली आहे. या यादीत भारतातील उमेश सचदेव यांचा समावेश आहे. जगभरातील कोणत्याही भाषेेमध्ये मोबाइलचा वापर करता येईल, असे सॉफ्टवेअर ३० वर्षीय उमेशने बनवले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगभरातील २५ भाषा आणि १५० बोलीभाषांनी "प्रोसेस' करता येते. जगभरात पाच कोटींपेक्षा जास्त लोक या साॅफ्टवेअरचा वापर करत आहेत. यामध्ये सर्वात जास्त भारतीयांचा समावेश आहे. उमेशने हे साॅफ्टवेअर बनवायला २००७ मध्ये सुुरुवात केली होती. मित्र रवी सरावगीसोबत उमेश तामिळनाडूमधील गावात गेला. त्या वेळी दोघांचेही नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेले होते. त्यांनी मोबाइल तंत्रज्ञान कंपनी स्थापन केली होती, ज्यासाठी नवीन कल्पनेचा विचार सुरूच होता. कोट्यवधी लोकांना फायदा होईल असे काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती. या वेळी कल्पना सुचली नाही, तर नोकरीसाठी अर्ज
करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता.

उमेश आणि रवी अनेक घरांमध्ये गेले, त्या वेळी जवळपास प्रत्येक घरातील व्यक्ती मोबाइल वापरत असल्याचे त्यांना दिसले. मात्र, ते फक्त कॉल करण्यासाठी मोबाइल वापरत होते. त्यांना इंटरनेट किंवा इतर कोणतीच सेवा वापरता येत नव्हती. त्या लोकांना मोबाइलची भाषा कळत नव्हती आणि त्यांना जी भाषा येते किंवा ते त्या भाषेत बोलतात त्या भाषेचा पर्याय मोबाइलमध्ये उपलब्ध नव्हता. देशात सुमारे ७८० भाषा तसेच बोलीभाषा आहेत. मात्र, अनेक फोनमध्ये फक्त इंग्रजी आणि हिंदीचा पर्याय उपलब्ध आहे.

उमेश आणि रवीने याच कल्पनेवर काम करायला सुरुवात केली. त्यांनी युनिफोर सॉफ्टवेअर सिस्टिम कंपनी बनवली. फोन फायनान्शिअल इन्क्युजन वाढवण्यास मदत करत असल्याचे उमेश सांगतात. या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मिळू शकते. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञान तसेच लोेकांमध्ये संवादाची आवश्यकता आहे. उमेश सॉफ्टवेअर डिजिटल आणि वास्तविक जीवनातील पुलाचे काम करत असल्याचे मत टाइम नियतकालिकाने व्यक्त केले आहे.
पुढे वाचा...
हे आहेत जग बदलणारे युवा उद्योजक
बातम्या आणखी आहेत...