आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्याजदरात कपातीचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज, आरबीआयचे नाणेनिधी धोरण आज जाहीर होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उतरणीला लागलेली महागाई अाणि अार्थिक अाघाडीवरील चांगली स्थिती लक्षात घेता गुंतवणूक तसेच अार्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक अाॅफ इंडिया मंगळवारी जाहीर हाेणाऱ्या नाणेनिधी धाेरण अाढाव्यामध्ये व्याजदर कपात करेल, असा अंदाज बँक तसेच उद्याेग क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला अाहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी यंदाच्या अार्थिक वर्षात जानेवारी अाणि मार्च या महिन्यात रेपाे दरात प्रत्येकी पाव टक्के कपात केली. सात एप्रिल राेजीच्या नाणेनिधी धाेरण अाढाव्यामध्ये मात्र व्याजदरात काेणताही बदल करण्यात अाला नाही.

अर्थमंत्री अाशावादी : अर्थमंत्री अरुण जेटली अाणि मुख्य अार्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनीदेखील व्याजदर कपातीबद्दल अाशावाद व्यक्त केला अाहे. महागाईबाबतच्या अंदाजाचे विश्लेषण, अार्थिक सर्वसमावेशकता, अांतरराष्ट्रीय वातावरण या सगळ्या गाेष्टी बघता त्याला नाणेनिधी धाेरण कसा प्रतिसाद देते ते बघावे लागेल. पण या वेळी नाणेनिधी धाेरण सुसह्य हाेण्याची शक्यता अाहे, असे मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.

सकारात्मक गाेष्टी
>घाऊक महागाईचा एप्रिलमध्ये -
२.६५ असा नवा नीचांक
>किरकाेळ किमती कमी हाेण्याचा सूर
>२०१४-१५ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत ४ टक्क्यांवर

निधी येण्यास मदत
बँकिंग यंत्रणेत खेळते भांडवल अाहे, परंतु कर्ज उचल कमी आहे. त्यामुळे रेपाे दरातील कपातीमुळे बँकांच्या पदरात फारसे पडत नाही. परंतु सीअारअारचे प्रमाण कमी झाल्यास निधीचा खर्च कमी हाेण्यास मदत हाेऊ शकेल. त्यामुळे बँकिंग यंत्रणेत ४० हजार काेटी रुपयांचा निधी येऊ शकेल.
टी. एम. भसीन, अध्यक्ष, इंडियन बँक्स असाेसिएशन

आर्थिक वाढ
किरकाेळ महागाई सध्या चांगल्या स्थितीत असल्यामुळे पाव टक्के व्याजदर कपातीची अपेक्षा अाहे. पण या वेळेला व्याजदरात कपात झाली नाही तर त्यानंतर अल निनाेचे परिणाम िदसायला लागल्यानंतर कपात करणे कठीण हाेईल. त्यामुळे अार्थिक वाढीला गती देण्यासाठी व्याजदर कमी हाेणे गरजेचे अाहे.
पी. श्रीनिवासन, मुख्य कार्यकारी अधिकारी, युनायटेड वेस्टर्न बँक