आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात २०१६ मध्ये सरासरी १०.८ टक्के पगारवाढ अपेक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्यावसायिक दृष्टिक्षेपात उत्साह दिसत नसला तरी २०१६ मध्ये भारतीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात १०.८ टक्क्यांची वाढ करतील, अशी अपेक्षा आहे. त्यातच नोकरीत चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तीची १२.५ टक्के वेतनवाढ होण्याची आशा आहे.
चांगल्यापेक्षा अधिक आणि चांगली कामगिरी करणाऱ्या नोकरदाराची ११ आणि ९.७ टक्के पगारवाढ होईल, असा दावा टॉवर्स वॉटसनने जाहीर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.
"टॉवर्स वॉटसन २०१५-१६ एशिया-पॅसिपिक सॅलरी बजेट प्लॅनिंग' नावाने जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात भारतीय कंपन्यांच्या उद्योगात कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण १०.८ टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ६.१ टक्क्यांच्या दराने महागाई अॅडजस्ट केल्यास पुढील वर्षी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४.७ टक्के वाढ होईल, जी गेल्या
वर्षीच्या तुलनेत जास्त असेल. गेल्या वर्षी शुद्ध पगारवाढ ४.५ टक्के झाली होती आणि या दरम्यान महागाई ५.९ टक्के होती.
आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत ५८ टक्के कर्मचाऱ्यांना भारतीय व्यवसायाची स्थिती उत्साहित वाटत नसताना पगारवाढीसंदर्भातील हा अहवालाचा दृष्टिकोन तयार करण्यात आला असल्याचे देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
आशियात ६.८ टक्के पगारवाढ
आशिया प्रशांत क्षेत्रात ६.८ टक्के पगारवाढ होण्याची अपेक्षा आहे. २०१५ मध्ये झालेल्या ६.६ टक्के पगारवाढीपेक्षा ही वाढ जास्त आहे. मात्र, यामध्ये महागाईचा समावेश केल्यास ही पगारवाढ शुद्ध ३.४ टक्के होईल, जी या वर्षी ४.१ टक्के होईल. टॉवर्स वॉटसनने हा सर्व्हे आशिया - प्रशांत क्षेत्रातील २२ पैकी १७ बाजारांत केला आहे. यामध्ये पुढील वर्षी कर्मचारी कमी पैसे घरी घेऊन जातील, हे समोर आले आहे.
पगाराचा स्मार्ट वापर
तेजीने हात असलेल्या चढ-उतारात लोकांच्या कमतरतेमुळे पगारात वारंवार बदल करावा लागतो. याकडे पाहता कंपन्यांकडे असलेल्या मर्यादित पगाराचा स्मार्ट वापर करण्याची आवश्यकता आहे.
संभव रक्यान, डेटा सेवा सराव प्रमुख, टॉवर्स वॉटसन
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सर्वाधिक पगारवाढीचे क्षेत्र..