आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीदीच्या दादागिरीसमोर उबरचे समर्पण, ‘दीदी चुजिंग’ चीनमध्ये अग्रणी टॅक्सी बुकिंग अॅप कंपनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - अॅपवर आधारित कॅब सेवा देणारी कंपनी उबरने चीनमधील स्पर्धक कंपनी दीदी चुजिंगसमोर समर्पण केले आहे. चिनी कंपनीने चीनमध्ये उबरच्या सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाचे अधिग्रहण केले आहे. या करारानंतर दीदीचे संस्थापक चेंग वेइ आणि उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ट्रेविस कलानिक एकमेकांच्या कंपनीत संचालक मंडळात असतील. दीदी चुजिंग ही चीनमधील टॅक्सी बुकिंग अॅप सेवा देणारी अग्रणी कंपनी आहे. या कंपनीची बाजारात ९० टक्के भागीदारी आहे.

दोन्ही कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये उबरने बाजारात आपले स्थान मजबूत करण्यासाठी दोन अब्ज डॉलरचे (१३३ अब्ज रुपये) नुकसान सहन केले, तर दुसरीकडे दीदी चुजिंगने आपल्या चालकांना तसेच ग्राहकांना जास्त सबसिडी देत व्यवसायावर आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. या करारानंतर दीदीचे भांडवली मूल्य सुमारे २३४५ अब्ज रुपये (३५ अब्ज डॉलर) होणार अाहे.

चीनमध्ये अनेक कंपन्या अयशस्वी : चीनमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक अमेरिकी कंपन्या अयशस्वी झाल्या आहेत. २००५ मध्ये याहू इंकनेदेखील खूप प्रयत्नांनंतर आपला चीनमधील व्यवसाय एक अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह अलिबाबाला विक्री केला होता. या व्यवहाराला सिलिकॉन व्हॅलीमधील कंपन्यांनी सर्वोत्कृष्ट व्यवहार असल्याचे संबोधले होते. चीनमध्ये बाजार नियम, प्रतिस्पर्धी आणि संस्कृतीच्या दृष्टीने खूपच किचकट असल्याचे मत हाँगकाँगमधील आरएचबी संशोधन संस्थेने व्यक्त केले आहे. चीनमध्ये येणाऱ्या बाहेरील कंपन्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो.

दीदीचे लक्ष भारतीय बाजाराकडे
बरचा व्यवसाय खरेदी केल्यानंतर आता दीदी चुजिंगला जगातील इतर कॅब आधारित स्टार्टअप्ससोबतच्या भागीदारीला नव्या दृष्टीने पाहावे लागणार आहे. दीदीने उबरशी स्पर्धा करण्यासाठी आधीच अमेरिकेतील लिफ्ट इंक, भारतातील ओला आणि दक्षिण आशियामधील ग्रेबसोबत मिळून जागतिक फोर्स बनवण्याचे काम सुरू केले आहे. ग्रेबचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँथोनी टेन यांनी उबरसोबत झालेल्या या करारामुळे स्पर्धेत दीदीचा विजय झाला असल्याचे सांगितले आहे. तसेच देशांतर्गत कंपन्यांचे वर्चस्व सेवा व्यवसायात सिद्ध होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...