आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uks Bagris Snap Up Leela Hotel Goa For Rs 725 Crores

गोव्यातील \'लीला\' 725 कोटींमध्ये खरेदी करणार भारतीय वंशाचा ब्रिटिश बिझनेसमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय वंशाचे ब्रिटिश बिजनेसमन राज बागडी गोव्यातील हॉटेल 'लीला' खरेदी करणार आहे. सुमारे 725 कोटी रुपयांमध्ये हा सौदा झाल्याची माहिती मिळाली आहे. हॉस्पिटालिटी सेक्टरमधील देशातील ही सर्वात महागडी सिंगल प्रॉपर्टी डील मानली जात आहे. व्यवहार झाल्यानंतर या हॉटेलच्या नावात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मेटडिस्ट ग्रुपचे प्रमोटर राज बागडी यांचा मलेशिया आणि जगातील दुसर्‍या भागात मेटलचा बिझनेस आहे. बागडी यांनी गेल्या वर्षी जगातील प्रसिद्ध डेनिम ब्रँड स्पायकर खरेदी केला होता.
मेटडिस्ट ग्रुपचे Ceres हॉटेल्स नामक एक लोकल यूनिट हॉटेल 'लीला' खरेदी करत आहे. ही प्रक्रिया साधारण‍ वर्षभर चालणार आहे.

24 वर्षांपूर्वी बनले होते 'लीला हॉटेल'
गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर 1991 मध्ये हॉटेल 'लीला'चे बांधण्‍यात झाले. 50 एकर जमिनीवर या हॉटेलचा विस्तार करण्‍यात आला आहे. देशातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये 'लीला' हॉटेलचा समावेश आहे. लीला ग्रुपने या हॉटेलच्या माध्यमातून 762 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.
'लीला ग्रुप'मध्ये गुंतवणूक करून देशात बिझनेस वाढवण्याचा आमचा उद्देश असल्याचे MetTube ग्रुपचे अध्यक्ष व सीईओ राघव मित्तल यांनी सांगितले. MetTube ही सेरेस हॉटेलची पॅरेंट कंपनी आहे.

हाऊस ऑफ लॉर्ड्सचे माजी सदस्य आहेत राज बागडी
अनिवासी ब्रिटिश सिटीजन बनण्याचा पहिला बहुमान राज बागडी यांना मिळाला होता. त्यानंतर ते लंडन मेटल एक्स्चेंजचे चेअरमन झाले. बागडी यांची कंजरव्हेटिव्ही पार्टीतर्फे 'हाऊस ऑफ लॉर्ड्स' सदस्य म्हणूनही निवड झाली होती. राज यांचे चिरंजीव अनूप बागडी हे ग्रुपचे व्यवस्थापक आहेत. मेटडिस्ट ग्रुप आता रियल इस्टेट व इन्शुरन्स सेक्टरमध्येही पदार्पण करणार आहे.

दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला आयटीसी हॉटेल्सने गोव्यातील पार्क हयात हॉटेलला 515 कोटी रुपयांत खरेदी केले होते. पार्क हयात हॉटेलमध्ये 250 रुम आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, गोव्यातील समुद्र किनार्‍यावरील आलिशान हॉटेल लीलाचे फोटोज...