मुंबई- औरंगाबाद व वर्धा ड्रायपोर्टच्या जागेचा प्रश्न मिटला असून पुढच्या महिन्यात त्याचे काम सुरू होण्याची शक्यता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन कंपनीच्या कार्यक्रमात शुक्रवारी गडकरी म्हणाले, दोन्ही बंदरांबाबत शनिवारी बैठक होत आहे. ही बंदरे झाल्यास औरंगाबाद येथून कंटेनर रेल्वेने मुंबईला येतील. त्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होईल. मालवाहतूक खर्चात कपात व आयात-निर्यातीला चालना देण्यासाठी हे ड्रायपोर्ट आहेत. जल मालवाहतूक ही यात मुख्य भूमिका निभावणार आहे. त्यामुळे निर्यातीच्या संधी वाढतील, असे ते म्हणाले.
देशातल्या ३० बंदरांतून होणारी मालवाहतूक सुकर होण्यासाठी रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांची उभारणी, कामकाज देखभाल करण्याच्यादृष्टी ने इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन कंपनी स्थापण्यात आली आहे. या कंपनीमुळे बंदरांची क्षमता वाढवणे, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच मालवाहतुकची खर्चही कमी होण्यास मदत होईल. या कंपनीचे ५०० कोटी रुपयांचे अधिकृत भांडवल असेल. देशातील महत्वाची १२ बंदरे तसेच रेल्वेची या कंपनीत भांडवली गुंतवणूक असेल.
गुंतवणूक वाढेलड्रायपोर्टमुळे औरंगाबाद रेल्वे व रस्ते मार्गे जेएनपीटीला जोडले जाईल. यामुळे कृषी व औद्योगिक उत्पादन आायात -निर्यात सुलभ होईल. औद्योगिक, व्यापार व गुंतवणुकीला चालना मिळेल.