आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉनने दोन स्पेक्ट्रम आयडिया कंपनीला विकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टेलिकॉम क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व्हिडिओकॉन समूहाने आपल्याकडील सातपैकी दोन स्पेक्ट्रम आयडिया सेल्युलार कंपनीला विकल्याची घोषणा बुधवारी केली. उत्तर प्रदेश आणि गुजरात सर्कलमधील १८०० मेगाहर्ट्स बँडपैकी पाच मेगाहर्ट्सचे हे दोन विशेष स्पेक्ट्रम आहेत. या दोन सर्कलसाठी झालेला हा व्यवहार ३३१० कोटी रुपयांचा आहे.

व्हिडिओकॉनकडे उत्तर प्रदेश पूर्व व पश्चिम, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या सहा सर्कलसाठी १८०० मेगाहर्ट्स बँडमध्ये पाच मेगाहर्ट्सचे विशेष स्पेक्ट्रम असून व्हिडिओकॉनने २०१३ मध्ये झालेल्या लिलावात ते मिळवले होते. या सहा सर्कलपैकी तीन सर्कलमध्ये कंपनीने पू्र्ण क्षमतेने व्यवसाय सुरू केला असून उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मात्र कंपनी भागीदारांच्या शोधात होती.

आगामी काळात कंपनीचे भागभांडवल सुमारे १४,००० कोटींपर्यंत वाढवण्याच्या दिशेने कंपनीचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. येत्या दोन वर्षांत हे भांडवल उभे करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीकडे १८०० मेगाहर्ट्झपैकी विक्रीयोग्य असलेले उपरोक्त नमूद स्पेक्ट्रम ४-जी सेवेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मानले जातात.