आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिअाेकाॅन टेलिकाॅम देणार माेफत इंंटरनेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे व्हिडिअोकॉन टेलिकॉमनं ठरवलं आहे. बिगर डाटा ग्राहकांसाठी मोफत डेटा पुरवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. डेटा वापरण्याबाबतचे अज्ञान आणि त्याच्या अतिरिक्त खर्चाबाबत साशंकता या दोन कारणांमुळे ग्राहक डेटा वापराकडे वळत नसल्याचे एका पाहणीत अाढळून अाले अाहे.

टेल्को नं. फ्री हेल्पलाइन सेवा “व्हिडिओकॉन कनेक्ट” रिलेटही स्थापन केलं आहे. अशा ग्राहकांसाठी प्रायोगिक सूट म्हणून ग्राहकांना दाेन महिन्यांसाठी ७५० एमबीचा डेटा मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये इंटरनेट, सर्च इंजिनचा वापर, सोशल मीडिया अकाउंट्सची सेटिंग आदींबाबत माहिती दिली जाईल. या सूटचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिअोकॉनच्या एका विशिष्ट क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर ग्राहकाची पात्रता तपासून डिजिटल हेल्पलाइन ग्राहकाशी संपर्क साधून त्याला सूट दिली जाईल. पहिल्यांदा मोबाइल वापरणारा ग्रामीण ग्राहक आणि व्हिडिअोकॉन स्मार्टफोनकडे वळणारा ग्राहक या दोघांसाठी ही मोहीम आहे.