आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॉक्सवॅगनमध्ये ५ वर्षांत ३० हजार कर्मचारी कपात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रँकफर्ट - जर्मनीतील कार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेली फॉक्सवॅगन कंपनी पाच वर्षांत ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेदरम्यान याबाबतीत एकमत झाले आहे.

कंपनीला आर्थिक बळकटी मिळावी यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले असून यातून बचत होणारा निधी कंपनी वापरासाठी आणि इलेक्ट्रिक कार निर्मितीत गुंतवणूक केला जाणार आहे. या निर्णयाने रोजगाराच्या नवीन संधी मिळणार असल्याचे सांगितले जाते. परंपरागत कार बनवणाऱ्या विभागात मोठ्या प्रमाणावर कामगार कपात होणार असली तरी इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या विभागात नऊ हजार नवीन नोकऱ्या दिल्या जातील, असे कंपनीने म्हटले. कंपनीच्या व्यवस्थापकांनी जर्मनीतील वॉल्फ्सबर्ग येथील प्लांटमध्ये इलेक्ट्रिक स्पोर्ट््स युटिलिटी व्हेइकल तयार करण्यावर सहमती दर्शवली आहे. दरम्यान, डीझल अॅमिशन चिटिंग घोटाळ्यात अडकल्यानंतर युरोपमधील सर्वात मोठ्या ऑटो-मेकर कंपनीला जर्मनीतील युनिटमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च लागत आहे. एकट्या जर्मनीत ही कंपनी २३ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. फॉक्सवॅगनच्या मते, कर्मचारी कपातीनंतर त्यांना वार्षिक ५.५८ अब्ज डॉलरची (जवळपास ३८,०१६ कोटी रुपये) बचत होईल. कंपनीत जगभरातील एकूण ६,१०,०७६ कर्मचारी काम करतात.
बातम्या आणखी आहेत...