आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीआर गेमिंगचा व्यवसाय; स्टार्टअप्ससाठी नवा फंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंड येथील २५ वर्षीय समांथा किंग्सटन या दोन वर्षांपूर्वी मार्केटिंगची नोकरी करत होत्या. एका कन्सल्टिंग कंपनीने त्यांच्याशी संपर्क साधून गेमिंगमध्ये करिअर करण्यासंदर्भात विचारणा केली. समांथा यांना त्या क्षेत्राचा अनुभव नसल्याने त्यांनी नकार दिला. पण सतत विचारणा होत असल्याने त्यांनी गेमिंग क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची नवीन कंपनी व्हर्च्युअल रिअॅल्टी (व्हीआर) हेडसेटसाठी गेम्स बनवते. नोकरी स्वीकारतानाच समांथा यांनी गेम्सबद्दल काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगून टाकले होते. सीईओने मात्र प्रतिप्रश्न करत तुम्ही माझ्यासोबत तंत्रज्ञान शिकण्यास इच्छुक आहेस का? असे विचारले. यामुळे तिचा उत्साह वाढला आणि बहुतांश वेळ त्या तंत्रज्ञान शिकण्यात खर्ची घालत होत्या.
नवीन कंपनीत समांथा यांनी नऊ महिने काम केले. यादरम्यानच त्यांनी गेमिंगबद्दल सर्व शिकून घेतले. यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आज त्यांची “व्हर्च्युअल अम्ब्रेला’ नावाची व्हीआर कंपनी आहे. नोकिया आणि दुसऱ्या मोठ्या कंपन्यांसाठी त्या व्हीआर कंटेंट बनवतात. फेब्रुवारीमध्ये कंपनीने लंडनमध्ये व्हर्च्युअल रिअॅल्टी इव्हेंटचे आयोजन केले होते. समांथा यांच्यासाठी व्हीआर म्हणजे स्वत:ला वेगळ्या विश्वात नेणे होय. किचन किंवा बेडरूममध्ये बसल्या बसल्या हेडसेट घालून दुसऱ्या जगात पोहोचता येते. परंतु हा व्यवसाय एकदम नवीन आहे. समांथा यांच्या मते, “व्यवसाय कसा करावा हे कोणत्याही पुस्तकात लिहिलेले नाही. सर्वकाही स्वत:लाच शिकावे लागते. माझी कंपनी तर केवळ सव्वा वर्ष जुनी आहे. नवीन क्षेत्र असल्याने मी अजूनही शिकत आहे. सध्या जाहिरात एजन्सी हा व्यवसाय कसा चालतो ते जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रातील कंपन्याही यात फायदे शोधत आहेत.’
स्मार्ट फोनसह झपाट्याने वाढेल
समांथा यांच्या मते, व्हीआरची क्रेझ वाढणार आहे. विशेष करून मोबाइल फोनसोबत अॅटॅच होणाऱ्या हेडसेटची मागणीही वाढेल. अधिकाधिक कंपन्या स्पर्धेत उतरल्याने याला बनवण्याचा खर्च घटेल आणि विक्री वाढेल. या तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत असून फोन कंपन्याही याचे समर्थन करत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत क्लाऊड गेमिंगचे चलन वाढू शकते. प्रोसेसिंगचे काम डाटा सेंटरमध्ये झाले तर ग्राहकांसाठी सेट आणखी स्वस्त होतील.
भारतातही व्हर्च्युअल गेमिंगला भविष्य
देशात मोबाइल फोनची संख्या एक अब्जहून अधिक झाली असली तरी स्मार्टफोनची संख्या २५ टक्के आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांची विक्री झपाट्याने वाढत आहे. स्मार्टफोनची विक्री वाढण्यासह व्हीआर गेमिंगची मागणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात केवळ ४०० रुपयांना हेडसेट मिळत आहेत, परंतु चांगल्या दर्जाच्या सेटची किंमत दीड हजारांच्या जवळपास आहे.
बातम्या आणखी आहेत...