आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न प्रक्रिया: देशात छोट्या शीतगृहांची गरज; ९२,००० कोटी रुपयांचे खाद्यान्न जाते वाया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात फक्त २ टक्के खाद्यान्नावर प्रक्रिया होत असून दरवर्षी ९२,००० कोटी रुपयांचे खाद्यान्न वाया जात असल्याची माहिती केंद्रीय खाद्यप्रक्रिया मंत्री साध्वी निरंजना ज्योती यांनी मंगळवारी दिली. या क्षेत्रात आणखी अनेक कामे होणे बाकी असल्याचेही त्या म्हणाल्या. कृषी-बिझनेस आणि डेअरी (एफएडी) इंटरनॅशनल समिटमध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या क्षेत्राला चालना देण्यासाठी मंत्रालयाच्या वतीने काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात कोणतीही नीती बनवताना छोट्या शेतकऱ्यांचा विचार करणे आवश्यक आहे. अन्नधान्याचा साठा करण्यासाठी योग्य आणि पुरेशी व्यवस्था नसल्यामुळेच छोट्या शेतकऱ्यांना आपले पीक कमी भावात विकावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये भाजीपाल्याचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे त्या म्हणाल्या.

अन्नधान्याची ही नासाडी रोखण्यासाठी आपल्याला गाव पातळीवर छोट्या शीतगृहांची स्थापना करावी लागणार आहे. यामुळे असे शेतकरी त्यांच्या पिकाची साठवणूक करून नंतर त्याची चांगल्या किमतीत विक्री करू शकतील. सध्या आवश्यक असलेल्या एकूण सुविधांपैकी देशात फक्त ५० टक्के सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोजगाराच्या संधी
सध्या अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये १७ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे रोजगार निर्माण करण्यात फूड पार्क हे महत्त्वाचे योगदान देऊ शकते. या क्षेत्रात आणखी रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. गुजरातजवळ या क्षेत्रात काम करण्याची संधी
असली तरी त्या प्रमाणात येथे कमी सुविधा आहे. त्यामुळेच गुजरातमध्ये सुरत, कच्छ आणि मेहसाणा जिल्ह्यात नव्या फूड पार्कला मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणादेखील साध्वी निरंजना ज्योती यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...