आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ महागाई सहा महिन्यांच्या नीचांकावर; भाजीपाला, डाळी आणि अन्नधान्ये झाले स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजीपाला, डाळी आणि अन्नधान्ये स्वस्त झाल्याने मार्चमध्ये किरकोळ महागाईने सहा महिन्यांतील नीचांकी ४.८३ टक्के ही पातळी गाठली. ग्राहक किंमत निर्देशांक म्हणून ओळखला जाणारा हा महागाई दर फेब्रुवारीमध्ये ५.२६ टक्के होता. सप्टेंबर २०१५ मध्ये हा महागाई दर ४.४१ टक्क्यांवर होता. सांख्यिकी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई दर मार्चमध्ये ५.२१ टक्के झाला. फेब्रुवारीमध्ये हा दर ५.३० टक्के होता. मार्चमध्ये भाजीपाला ०.५४, तेल ४.८५, दूध व दुग्धजन्य उत्पादने ३.३३ टक्के दराने वाढली.

येस बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ शुभदा राव यांनी सांगितले, अन्नधान्याची महागाई येत्या दोन ते तीन महिन्यांत वाढेल, मात्र चांगला पाऊस झाल्यास किमती घटतील. एकंदरीत महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टांच्या कक्षेत राहण्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँके जूनमध्ये रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता आहे. बार्कलेजचे सिध्दार्थ सन्याल यांच्या मते, वर्षभरात महागाई दर सरासरी ४.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआयचे अर्थतज्ज्ञ ए. प्रसन्ना म्हणाले, महागाई ५ टक्क्यांपेक्षा कमी राहिली तर रिझर्व्ह बँक आगामी काळात व्याजदर घटवू शकते. सेवा क्षेत्रातील महागाईबाबत मात्र त्यांनी चिंता व्यक्त केली

औद्योगिक उत्पादनात २ टक्के वाढ
मागील तीन महिने घसरणीच्या वाटेवर असलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात फेब्रुवारी महिन्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाण, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राच्या उत्तम कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादनवाढीला चालना मिळाली आहे. यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा ७५ टक्के आहे.