आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक बँकेने भारताचा विकास दर अंदाज घटवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जागतिक बँकेने आर्थिक वर्ष २०१६ मध्ये भारताच्या विकास दराचा अंदाज कमी केला आहे. यामध्ये ०.२ टक्क्यांची घट करत भारताचा विकास दर ७.७ टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने जात असल्याचे मतही जागतिक बँकेने व्यक्त केले आहे. या संदर्भात जागतिक बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार २०१६-१७ ते २०१८-१९ दरम्यान भारताचा विकास दर ७.६ ते ७.७ टक्के राहण्याची शक्यता आहे.

जागतिक बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या अहवालानुसार जागतिक विकास दराचा अंदाज कमी करण्यात आला असून यात ०.५ टक्क्यांची घट करून त्याला २.९ वरून २.४ करण्यात आले आहे. काही प्रमाणात अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, कमोडिटीचे दर कमी होणे, व्यापारात मंदी तसेच बाजारात असलेल्या चलनाची उपलब्धता या सर्वात घट झाल्यामुळे जागतिक पातळीवर विकास दर कमी होणार आहे. त्यामुळे या आधी जानेवारीत जाहीर करण्यात आलेल्या २.९ टक्क्यांच्या विकास दराच्या अंदाजात घट करण्यात आली आहे.

भारतात एफडीआयमध्ये वाढ
जागतिक बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या अहवालानुसार भारतात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) करणे सुलभ झाल्यामुळे ऑक्टोबर २०१४ ते फेब्रुवारी २०१६ पर्यंत एफडीआय ३७ टक्क्यांपर्यंत वाढली. यादरम्यान कॉम्प्युटर सॉफ्टवेअर तसेच ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली आहे.

चीनचा विकास दर कायम
जागतिक बँकेने चीनच्या विकास दराचा अंदाज अाधी जाहीर केल्याप्रमाणे कायम ठेवण्यात आला आहे. यानुसार २०१८ पर्यंत थोड्याफार मंदीसह चीनचा विकास दर ६.७ टक्के कायम राहील.
बातम्या आणखी आहेत...