आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Bank Invest In Agriculture In Maharashtra Stat

जागतिक बँकेची राज्यात कृषी क्षेत्रात गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी या क्षेत्रातील भरीव गुंतवणुकीसह मुंबईतील पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मूल्याणी इंद्रावती यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाशी चर्चा केली.
प्रामुख्याने राज्याच्या दुष्काळी भागात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सहा हजार गावांमध्ये एक लाख कामे झाली असल्याची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी जागतिक बँकेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी शिष्टमंडळासोबत मुंबई मेट्रोसह इतर प्रकल्पांबाबतही चर्चा
करण्यात आली.

बँकेची आश्वासने
{ मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात दीर्घकालीन प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून सहकार्य.
{ मेट्रो प्रकल्पासाठी सहकार्याबाबत सकारात्मक विचार.
{"इज ऑफ डुईंग बिझिनेस'ला विविध पातळ्यांवर सहकार्य
{ मुंबईतील सार्वजनिक परिवहन यंत्रणेत सुधारण्यासाठीही मदत