आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात येणार 500 नव्या विमा योजना,विमा क्षेत्रासाठीचे नवे मार्गदर्शक तत्त्वे मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विमा क्षेत्रासाठीच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांना भारतीय आयुर्विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) मंजुरी दिली असून त्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून होत आहे. त्यामुळे या नवीन मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून नवीन वर्षाच्या पुढील काही महिन्यांत जवळपास 500 नवीन विमा योजना बाजारात येण्याची शक्यता आहे. बहुतांश विमा कंपन्यांनी त्यासाठी तयारी केली आहे.
देशातील विमा कंपन्यांसाठी विमा नियंत्रकांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे 500 उत्पादनांना हिरवा कंदील दिला आहे. त्यादृष्टीने बहुतांश विमा कंपन्यांनी आपल्या विमा योजनांमध्ये अगोदरच आवश्यक तो फेरबदल केला असून त्यासाठी मान्यता देखील मिळवली आहे.
प्राधिकरणाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे विमा योजना अधिक ग्राहकाभिमुख होणार आहेत. पारंपरिक विमा योजना, बदलत्या विमा योजना आणि युनिटशी निगडित विमा योजना (युलिप) या प्रमुख तीन विमा उत्पादनांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणण्यात आली आहेत.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने अगोदरच 48 विमा योजनांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठी एलआयसीने जीवन आनंद, जीवन मधुर, जीवन सरल या तीन योजनाही बंद केल्या असून काही नवीन विमा योजनादेखील आणण्याची योजना आखली आहे.
इर्डाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बाजारात येणारी नवीन विमा उत्पादने
रिलायन्स लाइफ इन्शुरन्स : ०नवीन उत्पादने : 24
(पुढील तीन महिन्यांत)
मॅक्स लाइफ इन्शुरन्स : ०सध्या उपलब्ध : 13
०नवीन उत्पादने : 04
(जानेवारी पहिला आठवडा)
अविवा लाइफ इन्शुरन्स : सध्या उपलब्ध : 13
एचडीएफसी लाइफ : नवीन उत्पादने : 21
(एक जानेवारीपासून)
नव्या पॉलिसीसाठी सज्ज
एक जानेवारीपासून लागू होणा-या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार सध्या 13 ते 14 प्रमुख उत्पादनांची विक्री सुरू आहे. नवीन उत्पादने बाजारात आल्यावर पारंपरिक विमा योजनांची विमा व्यवसायात 80 टक्के तर युलिप योजनांमुळे 20 टक्के भर पडेल.’ अनुप राऊ, सीईओ, रिलायन्स लाइफ इन्शुरन्स