आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

50 कोटी भारतीयांचे उघडणार विश्वकर्मा अकाऊंट, पेन्शनसोबत मिळणार 10 फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकार कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना घेऊन येत आहे. - Divya Marathi
मोदी सरकार कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना घेऊन येत आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकारने 50 कोटी कामगारांना प्रोव्हिडेंट फंड, पेन्शनसह अनेक सामाजिक सुरक्षा देणारी यूनिव्हर्सल सोशल सेक्यूरिटी स्कीम तयार केली आहे. या योजनेंतर्गत सरकार 50 कोटी कामगारांचे विश्वकर्मा अकाऊंट उघडणार आहे. या खात्याच्या माध्यामातून 50 कोटी लोकांना पीएफ, पेन्शनसह 10 योजनांचा फायदा मिळणार आहे. याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात सरकार सर्वप्रकारच्या कामगारांना पीएफ आणि निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा देणार आहे. मोदी सरकारने या योजनेचा आराखडा तयार केला आहे. पुढील महिन्यात या योजनेवर सर्व स्टेकहोल्डर्ससोबत विचारविनिमय होणार आहे. 

 

कसे उघडता येणार विश्वकर्मा अकाऊंट 
- एखादा कामगार ज्या कंपनीत काम करत असेल  त्या कंपनी प्रशासनाची जबाबदारी आहे की त्यांनी कामगाराचे विश्वकर्मा कार्मिक सुरक्षा खाते उघडावे. जर कंपनीने निश्चित कालावधीमध्ये कामगाराचे खाते उघडले नाही तर कामगाराने स्वतः आपले खाते उघडावे. त्यासाठी सरकार वेगळी व्यवस्था करणार आहे. याशिवाय जर कोणी स्वयंरोजगार करत असेल तर त्याने स्वतः आपले खाते उघडावे. कामगाराचे हे खाते पोर्टेबल असेल. जर एखादा कामगार दिल्लीत काम करत असेल आणि त्याने तिथे विश्वकर्मा खाते उघडले असेल, त्यानंतर तो कोलकाता येथे जाऊन काम करत असेल तर त्याला वेगळे विश्वकर्मा खाते उघडण्याची गरज नाही. 

 

कामगारांची असणार वेगवेगळी कॅटेगरी 
- सरकारने 50 कोटी कामगारांना सामाजिक, आर्थिक आधारावर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागले आहे. यामध्ये जे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील त्यांना विश्वकर्मा अकाऊंटमध्ये स्वतःचे योगदान देण्याची गरज नाही. त्यांच्या पीएफ आणि पेन्शन योजनेसाठीचे संपूर्ण योगदान सरकार भरणार आहे. 
- जे कामगार आर्थिक सक्षम असतील ते सामाजिक सुरक्षेसाठी आपले योगदान देतील. ते त्यांच्या वेतनाच्या 12.5% पासून 20% पर्यंत आपले योगदान देऊ शकतात.  

बातम्या आणखी आहेत...