आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 मे पर्यंत आपल्या बँक अकाउंटमध्ये जरूर ठेवा 342 रुपये, नाहीतर होईल नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्हाला तुमच्या कुटूंबाला 4 लाख रुपयांचे सुरक्षा कवच द्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या बँक खात्यात 342 रुपये जरूर ठेवा. ही सुरक्षा तुम्हाला मोदी सरकारच्या दोन योजनातंर्गत मिळते. पंतप्रधान जीवन ज्‍योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अशी या योजनांची नावे आहेत. तुम्ही या दोन्ही योजना घेतल्या असतील तर तुमच्या अकाउंटमध्ये दरमहा 342 रुपये ठेवणे गरजेचे आहे. 

 

 

दरवर्षी या दोन योजनांचे पैसे मे महिन्यात कापण्यात येतात. पंतप्रधान जीवन ज्‍योती विमा योजनेचा प्रिमियम 330 रुपये असून पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा प्रिमियम 12 रुपये आहे. अशात जर तुमच्या खात्यात 342 रुपये नसतील तर तुमचा विमा रद्द होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगत आहोत तुम्ही या योजनांचा लाभ कसा घेऊ शकता.

 

 

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
- ही योजनेचे दरवर्षी नुतनीकरण होते. त्याचे वार्षिक शुल्क 330 रुपये आहे. 18 ते 50 वर्षाची व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकते. पण यासाठी आपले बँकेत अकाउंट असणे गरजेचे आहे. या अंतर्गत 55 वर्षापर्यंत तुम्हाला लाईफ कव्हर मिळते. कोणत्याही कारणामुळे विमा करणाऱ्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. या शर्तीही आहेत. त्यात प्रीमियम कट होताना बँकेच्या खात्यात योग्य रक्कम असण्याची गरज आहे. कुठलीही व्यक्ती केवळ एका विमा कंपनीद्वारे आणि एका बँक अकाउंटद्वारेच या योजनेशी निगडित होऊ शकते.  

 

सोर्स- https://www.jansuraksha.gov.in/Files/PMJJBY/English/About-PMJJBY.pdf

 

 

पुढे वाचा: पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

बातम्या आणखी आहेत...