नवी दिल्ली- मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढ केल्यानंतर आता सिमेंटच्या किंमतीही वाढ करण्यात आली आहे. नुकतेच रेल्वेने आपल्या मालवाहतुकीच्या दरांमध्ये 6.4 टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर आता सिमेंट कंपन्यांनीही आपल्या उत्पादनाच्या किंमतीत वाढ केली आहे. 'श्री सिमेंट'ने रेल्वे माल वाहतुकीचे दर वाढल्यानंतर प्रति गोणी आठ रुपयांनी दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी सप्टेंबर 2013 मध्ये सिमेंटच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली होती.
कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ने सिमेंटमध्ये वेगाने होणार्या वाढीला कॉम्पिटीशन कमीशन ऑफ इंडियामध्ये (सीसीआय) आवाहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सिमेंट महाग झाल्याने डेव्हलपर्सकरिता गृहनिर्माणच्या किंमतीत वाढ होईल असे मत क्रेडाईने मांडले आहे. याचा थेट परिणाम प्रॉपर्टीच्या किंमतींवर पडेल.
रियल्टी किंमतीत 20 टक्कयांनी होईल वाढ
# गृहनिर्माण क्षेत्र हे सिमेंटचा सर्वात मोठा ग्राहक आहे.
# एकूण सिमेंटच्या वापरामध्ये गृहनिर्माण क्षेत्राची 67 टक्के एवढी भागेदारी आहे.
# सिमेंटचा वापर करणार्या इतर ग्राहकांमध्ये पायाभूत घटक (इन्फ्रास्ट्रक्चर) (13 टक्के), व्यावसायिक बांधकाम (11 टक्के) आणि औद्योगिक बांधकाम (9 टक्के) एवढे आहे.
# सिमेंटच्या दरवाढीसोबतच स्टीलच्या किंमतींसोबतच कामगारांच्या वेतनांमध्ये वाढ होईल. याचा परिणाम बांधकामाचा खर्च हा 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे घरांच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
कमी होण्याऐवजी वाढले दर...
# क्रेडाईच्या म्हणण्यानुसार, मान्सून दरम्यान बांधकामांची कामे कमी होतात, त्यामुळे सिमेंटची मागणी कमी होते. त्यामुळे सिमेंटच्या किंमती कमी व्हायला हव्यात.
# मात्र सिमेंट कंपन्यांनी एकत्र येऊन चुकीच्या पध्दतीने दरवाढ केली आहे. क्रेडाई सिमेंटच्या दरवाढीला सीसीआयमध्ये आव्हान देणार आहे.
# मागील काही वर्षांत सिमेंटचे दर 120 रुपयांवरून (50 kg) 320 रुपयांवर पोहचले आहेत.