आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Life Inusrance Corporation By Adv. Kantilal Tated, Divya Marathi

वित्तीय ताकदीचे आयुर्विमा महामंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्विमा व्यवसायामध्ये नेत्रदीपक प्रगती करणाऱ्या, राष्ट्र उभारणीत मोलाचा आर्थिक सहभाग असणाऱ्या, देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व प्रचंड वित्तीय ताकद असणाऱ्या महामंडळाला १ सप्टेंबर २०१४ रोजी ५८ वर्षे पूर्ण झाली देशातील प्रचंड वित्तीय ताकद असणाऱ्या या आयुर्विमा महामंडळाचे नियंत्रण आपल्या हातात यावे, अशी देशी व विदेशी उद्योगपतींची इच्छा आहे. त्यामुळे आयुर्विमा महामंडळाचे खासगीकरण करावे यासाठी उद्योगपती व काही बलाढ्य राष्ट्रे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महामंडळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी देशातील जनतेने जागृत राहाणे आवश्यक आहे.

सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय प्रगती : महामंडळ स्थापनेवेळी सरकारने ५ काेटी रुपये भांडवल गुंतवले. राष्ट्रीयीकरणावेळी म्हणजे १९५६-५७ मध्ये विमा हप्त्यांद्वारे मिळणारी रक्कम ८८.६५ काेटी हाेती. त्या वेळी महामंडळाकडे केवळ ९.४१ लाख विमा पॉलिसी होत्या. तर २०१३-१४ या एकाच आर्थिक वर्षात महामंडळाने ३४५.१२ लाख विमा पॉलिसींची विक्री करून त्यापोटी ९०१२३.७५ काेटी रुपयांचे प्रथम वर्ष विमा हप्त्यांची रक्कम प्राप्त झालेली आहे. तसेच याच आर्थिक वर्षात विमाहप्त्यांपाेटी २४००४० काेटी रुपये मिळालेले असून महामंडळाचे या वर्षाचे एकूण उत्पन्न ३,८५,५०१ काेटी रुपये आहे. सध्या महामंडळाचे ३० काेटींहून अधिक विमाधारक आहेत. १९५७ मध्ये महामंडळाच्या लाइफ फंडाची रक्कम ४१०.४० काेटी रुपये हाेती. तर मार्च २०१४ राेजी महामंडळाचा लाइफ फंड १६०७०२४.९८ काेटी रुपयांचा आहे.
नफ्यामध्ये माेठ्या प्रमाणात वाढ -वित्तीय संस्थांत अव्वल स्थान : सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात आयुर्विमा महामंडळाला २६,३८४ काेटी रुपयांचा नफा (महामंडळाच्या भाषेत ‘सरप्लस’) झालेला आहे. देशातील सर्व वित्तीय संस्था, बँका तसेच कंपन्यांमध्ये नफ्याच्या बाबतीत महामंडळाचा दुसरा क्रमांक लागतो. (आेएनजीसीचा नफा २६,५०७ काेटी रुपये असून तीचा पहिला क्रमांक लागताे). महामंडळाची वित्तीय ताकद प्रचंड असून तीची मालमत्ता १७.६९ लाख काेटी रुपयांची आहे.

अर्थव्यवस्था सर्वच आघाड्यांवर निराशेच्या गर्तेत असताना महामंडळाची ही उल्लेखनीय प्रगती : प्रचंड वेगाने वाढणारी अभूतपूर्व महागाई, रुपयांचे सतत हाेणारे मूल्यऱ्हास, बचतीचे सातत्याने घटणारे प्रमाण व देशाची अर्थव्यवस्था सर्वच आघाड्यांवर निराशेच्या गर्तेत असताना महामंडळाने ही उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विमाधारकांना देण्यात येणाऱ्या सेवेचा सर्वाेच्च दर्जा, आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर, महामंडळाच्या व विमाधारकांच्या हितासाठी कटिबद्ध असलेले कर्मचारी, अधिकारी व विमा एजंट‌्स व ५८ वर्षांत महामंडळाने विमाधारकांचा संपादित केलेला विश्वास यामुळेच महामंडळाला हे यश प्राप्त करणे शक्य झालेले आहे.

महामंडळाची खासगी कंपन्यांवर मात : उद्याेगपती व परकीय बलाढ्य राष्ट्रे यांच्या दडपणाला बळी पडून विमाक्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले करताना महामंडळ खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत िटकणार नाही व त्या आधारावर आपण महामंडळाचे खासगीकरण करू, असे सरकारला वाटत हाेते. उद्याेगपतींना तर खात्रीच हाेती. परंतु, तसे घडले नाही. महामंडळाचा व्यवसाय कमी व्हावा यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले (उदा. ‘सरप्लस’ च्या ९५ टक्के रक्कम विमाधारकांना बाेनस वाटली जात हाेती. कायदा दुरुस्ती करून ते प्रमाण ९० टक्के केले) भारतातील विमाक्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले केले. त्या स्पर्धेत महामंडळाने आयुर्विम्याच्या बाजारपेठेत निर्वविाद वर्चस्व करून राष्ट्रीय उद्दिष्टपूर्ती केली आहे.
विमा हप्त्यांच्या बाबतीत बाजारातील हिस्सा ७५.३३ टक्के तर, विमा पाॅलिसींच्या बाबतीत ताे हिस्सा ८४.४४ टक्के : आयुर्विमा महामंडळाचा २०१३-१४ या आर्थिक वर्षात नवीन विमा हप्त्यांच्या बाबतीत बाजारातील हिस्सा ७५.३३ टक्के तर विमा पाॅलिसींच्या बाबतीत ताे हिस्सा ८४.४४ टक्के इतका आहे. तर खासगी क्षेत्रातील २३ विमा कंपन्यांचा बाजारातील एकत्रित िहस्सा अनुक्रमे २४.६७ टक्के आणि १५.५६ टक्के इतकाच आहे. महामंडळाला सर्वात जवळची असणारी खासगी क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपनी एसबीआय लाइफचा बाजारातील हिस्सा केवळ ४.२४ टक्के, एचडीएफसीचा ३.३७ टक्के तर आयसीआयसीआयचा िहस्सा ३.१४ टक्के इतकाच आहे. या कंपन्यांच्या समूहातील बंॅका या गृहकर्ज, कारलाेन आदी कर्जे देत असतात, त्या कर्जाला संरक्षण म्हणून विमा पाॅलिसी कर्जदारांना विमा पाॅलिसी घ्यावयास सांगतात. त्यांच्या व्यवसायातील माेठा भाग हा अशा विमा पाॅलिसींचा आहे.

दावापूर्तीत जगात पहिला क्रमांक : महामंडळाचे २०१३-१४ या आर्थिक वर्षातील दावापूर्तीचे प्रमाण ९९.६० टक्के आहे. तर खासगी विमा कंपन्यांचे प्रमाण ८८.६५ टक्के आहे. दाव्याच्या पूर्ततेत महामंडळाचा जगात पहिला क्रमांक लागताे. महामंडळाने सामाजिक क्षेत्र व पायाभूत सुविधांसाठी ३१ मार्च २०१४ पर्यंत १६८४६९० काेटींची गुंतवणूक करून जनतेच्या बचतीचा राष्ट्रउभारणीत वापर केला. परंतु, खासगी विमा कंपनीने पायाभूत सुविधांसाठी माेठी गुंतवणूक केलेली नाही.