आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banks Should Be Insurance Broker Necessary, Insurance Regulator Irda

बँकांना विमा ब्रोकर होणे लवकरच बंधनकारक,विमा नियामक इर्डाचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विम्याचा विस्तार करण्याबाबत काही लक्षणीय फरक आढळून न आल्यास बॅँकांसाठी सध्याच्या ‘एजंट’ऐवजी ‘ब्रोकिंग’ पर्याय बंधनकारक करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हटले आहे.
पुढील दोन ते तीन महिन्यांत एजंट मॉडेलमध्ये फारसा काही फरक पडलेला दिसून आला नाही तर बॅँकांसाठी ब्रोकर मॉडेल तयार करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे इर्डाने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या बैठकीत सांगितले असल्याचे एका विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.बॅँकांना ‘ब्रोकर्स’ म्हणून काम करण्याबाबत विमा नियामक अनुकूल असल्याचे संकेत ‘इर्डा’चे अध्यक्ष टी.एस. विजयन यांनी या अगोदरच दिले आहेत.
बँका सध्या आपल्या ग्राहकांना विमा उत्पादनांची विक्री करत आहेत. त्यामुळे एखाद्या विशिष्ट विमा कंपनीच्या उत्पादनांची विक्री करण्यापेक्षा बॅँकांनी ‘ब्रोकर’ या नात्याने अनेक विमा कंपन्यांचे प्रतिनिधित्व करून ग्राहकांना सर्वोत्तम विमा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे विजयन यांनी अलीकडेच मत व्यक्त केले होते.
इन्शुरन्स ब्रोकर या नात्याने विमा पॉलिसीबाबत ग्राहकांच्याप्रती बॅँका जबाबदार राहतात. विविध विमा कंपन्यांची उत्पादने बॅँका विकणार असल्याने ही जबाबदारी मोठी ठरते. विम्याचा विस्तार विशेष करून ग्रामीण भागात अगदी अत्यल्प होत असल्याने राष्‍ट्रीयीकृत बॅँकांनी जानेवारी अखेरपर्यंत इन्शुरन्स ब्रोकिंगचा पर्याय स्वीकारावा, असे वित्तमंत्रालयाने डिसेंबर महिन्यात बॅँकांना लेखी कळवले होते.
विमा विस्ताराचे प्रमाण कमी
जागतिक पातळीवर विमा विस्ताराचे प्रमाण जीडीपीच्या तुलनेत सरासरी 6.5 टक्के आहे. परंतु हेच प्रमाण भारतात किती तरी कमी म्हणजे 3.96 टक्के असल्याचे ‘इर्डा’ची आकडेवारी सांगते. विमा वितरणाच्या विविध माध्यमांवर चर्चा करणे आणि त्याचा मागोवा विमा कंपन्यांकडून घेणे हा मुख्य उद्देश या बैठकीचा होता. बँकांनी ब्रोकर म्हणून काम करतानाच एकापेक्षा जास्त विमा कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री करण्याबाबत विमा नियंत्रक प्राधिकरणाने मागील वर्षाच्या जुलै महिन्यातच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेनेदेखील या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून बँकांनी विमा ब्रोकिंग व्यवसाय करावा, असा निर्णय घेतला.